दिवाई दी लयी जास Khandeshi Ahirani Diwali
लेखक नानाभाऊ माळी
आते रात व्हयी जायेल सें!वर पुर्र अंधार सें!खाले फटुकडा फुटी ऱ्हायनात!अंधाराम्हा दिवाई चमकी ऱ्हायनी!नवा साज सिंनंगार नेसी आनंनं दि ऱ्हायनी!दारेदार रांगोया नजरन्ह पारन फेडी ऱ्हायनात!आज लक्षुमी पूजन सें!त्यांगुंता सहेरथून गावलें लोके कसा यी ऱ्हायनात तें आपले आयकनं सें? दखा मंग मव्हरे!
जथ्या बन तथ्या निस्त्या एस्ट्याचं एस्ट्या दिखी ऱ्हायत्यांत!लाल पऱ्या बोंब भरी भरी उपसा काढी ऱ्हायत्यांत!सहेर गावमा परवासी बोंब भरात का ठरेलं गावले स्टेरिंग मयडी पयी ऱ्हायंत्यातं!कोनी बोंब मारे!एसटी बोंब भरे!अथांनं वझ उखली तथा गावेगाव टाकीं टाकी निस्ती दमायन चालू व्हती!
आज लक्षमी पूजन सें!राहेल-सुहेल सरागंतं येचि टुची लोकेसलें गाव लयी जावानी जल्दी!गावले भिडानी जल्दी!वझा वर वझा ठी ठायी गाव कव्हयं यी यांनी कायजी!कोनी लक्झऱ्या बस बुक करेल तें कोनी एसटी बुक करेल!लक्झरीनं भाड चौपट शे!ज्या तालेवर सेतस त्या लक्झंरी बसम्हा रातभर जप काढी गावेसलें भिडी ग्यात!बाकींना एसटीनं तिकीट बुक करी सक्कायम्हा जम्हाया देत गावले भिडी ऱ्हायनात!आनी ज्यास्नी तिकीटचं बुक करेल नई व्हतं त्यास्ना हाल तें काय इचारूचं नका!ज्या गाडीम्हा पाय ठेवालें भी जागा भेटी तठे निस्त भूगल व्हई,उखुड बठी,चेपायी-चुपाई उभ ऱ्हावानं!जागा भेटनी का जागावरचं बठी लेवानं!एसटी पयेत ऱ्हास!लोके गाव जावागुंता,दिवाईगुंता,आपली माटीवर डोकं ठेवागुंता तरसेल
ऱ्हातसं!जीव गुदमरी घर जावालोंग जागा भेटी ऱ्हायनीं हायीचं मेहरबानी समजो!दिवाई गोड,मधाय,बर्फीगंतं ऱ्हास!हार परकारे गावले व्हढी लयी
येस!कोनी गावेसले पोहची ग्यात!कोनी आज पोहची जातीन!दिवाई डोयानी आनी मनन्ही हारकं ऱ्हास!पारख ऱ्हास!हारखे भरायी गांवगंम पयेत ऱ्हास!
सहेरम्हा इसनी हाऊ जिवडा वरीसभर रंगतनं पानी करतं ऱ्हास!चार पैसा कमायी,संगांयी-सुंगयी,कमायेल पैसा गावलें लयी जास!माय-बाप, भाऊ-बहिणी यांसले चांगला कपडा-लत्ता लेवानं ऱ्हास!नव-जूनं बठ्ठ करी आनंनंन्ही दिवाई करागुंता गावकडे पाय व्हडात ऱ्हातसं!हावू येडा व्हडा जित्ता पानींना झिरा ऱ्हास!नाता-गोतान्हा,रंगतन्हा व्हडा ऱ्हास!पाय जन्मदेतीगंम व्हडात ऱ्हातसं!हिरदन्हा उक्कय ऱ्हास!जे डोयाघायी दखेल ऱ्हास!कानवरी आयकेल ऱ्हास,तो व्हढा पाय व्हडी गावगंम व्हडत ऱ्हास!
गावले पयलेंगनांगत ऱ्हायन नई!माय बाप गावले ऱ्हातसं!खेती करागुंता हातसी पैसा लागतंस!मजुर बठ्ठ पोट भरागुन्ता सहेरम्हा पयी गये!जे ऱ्हायेलं सें तें यांयं मोजी मजुरी लेस!हातशी कंटोलन्हा तांदुई ऱ्हास!कायजी नई आते काल्दीसनी!खेती करान,नांगर खुपसी वावर खेडानं साधं ऱ्हायनं नई आते!आपला सारखा पोरे शिकी सवरी सहेर चालना ग्यात!मुंबई,पुणे,नासिक,संभाजीनगरलें चालना ग्यात!पगार पानी कमायी, लयीसनी पाच-सव दिन दिवाईनां आननं वाटालें येवानं!
इतला व्हडातान करी दिवायीलें येतांना सुख-दुखना चार सबद भांदी लयो!चार सबद आनंन्हा वाटालें यी जावो!गांवनं,घरंनं बठ्ठ सुख-दुःख हिरदम्हा ठीसनी मन हालकं करत ऱ्हावो!गोड- धोड खावो!चटोरी झिभले मोके सोडी वरपतं ऱ्हावो!अथ्या-तथ्या गप्पा मारी रातलें फटुकडा फोडी आनंनंन्ही दिवाई साजरी करी,पाच -चार दिन गावले ऱ्हायी बठ्ठ मनम्हा, हिरदम्हा ठी आखो सहेरम्हा बिन आऊतनीं दुसेरं मानवर ठी सोतालें जुपी लेवो!
गावथिन नींघानां दिन माय बापन्हा चार दिनन्हा आनंनं माव्वयी जास!माय म्हणस,” भाऊ कवय इसी? पुल्ली दिवाईलें नई!मधमा एखादी खेप मारी देत जाय!नात्रेस्ना संगे बरं वाटस!अमाया-कोमावा नींघी जास!” बोलता बोलता मायना डो्यांना आसूं गालवर उतरी येतंस!बाप बॅगास्मझार बयजबरी कायन्हा काही साफटा भांधी देस!उचलता येत नई इतलं भांदी देतंस!
भुईमुंगन्या शेंगास्नी पोतडी,लोसन्न्या जुड्या,झटकेल तिई,जुवारी-बाजरीन्या गोंट्या,बठ्ठ भांधी इस्टीस्टॅन्डवर पोहचडणारा बापचं ऱ्हास!आखो एस्टीम्हा कोंबिकांबी ज्या रस्ते उनुत त्याच रस्ते मांगे फिरो!डोया पूसी मायना पदर वल्ला व्हयी जास!दिवाई उनी तशी नींघी जास!दिवाई थोडी दि जास!संगे हिरद लयी जास!मनल्हे खुरखुरा लायी जास!दिवाई दि जास आनी लयी भी जास! नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-411028
मो.नं-9923076500
दिनांक-12 नोव्हेंबर 2023
(लक्षुमी पूजन)
