घाव करा तु गर्भावर स्त्री भ्रूण हत्या
अहिराणी भाषिक पोरे, पोरी मराठी नाटक, सिनमा, टीव्ही मालिका यामा दिखतस नही. लिखाण, अभिनय, नृत्य, संगीत, गीत यामा आपला लोक कोठेज दिखतस नही. पण खान्देशमा मातर अहिराणीमा एक गोटवर भलता जोर से, यूट्यूब व्हीडिओ क्लिप वरनां गाना. एक अंदाज से, कोटीना वर गुंतवणूक से या व्हिडीओमा. लायल पैसा वसुल व्हतस कां नही माहीत नई पन खर्च मातर व्हई ऱ्हायना. हाऊसले मोल नही म्हणतंस तेज खरं.
या गानासना ईशय बी एकज ठरेलं से. पोरं, जुवान पोरं, मामानी पोरं, झूमकावाली पोरं, गजरावाली पोरं, लंगावाली पोरं, रिबनवाली पोरं, गाव म्हानी पोरं, भायर गावनी पोरं, भाऊनी साली, नवरीनी कंडोलिन. तीन रंग रूप जवानी नी डरेस, शिलावा यावर बठा गांना नी डान्स. तीना संगे प्रेम. कवयमवय प्रेमभंग. मंग विरह गीत. यांना शिवाय दुसरा ईशय नही.
मराठी सिने अभिनेता विकास महाजन यांस्नी आते एक नवी क्लिप येयल से. त्यांना ईशय बी पोरज से. पन ती जुवान पोरं नही. नादान पोरं नही. ती पोरं गर्भ म्हायनी से. गर्भमाज मारी टाकेल पोरं. स्त्रीभ्रूण हत्या वर से. माले आवडनी ती क्लिप. न्यारा ईशय से. घाव करा तु गर्भावर!
दखा ती क्लिप तिले लाईक बी चांगला ई ऱ्हायनातं. समाज सुधारक ईशय से. मुख्य पात्र प्रशांत महाजनज से पन खल नाईक से विद्या भाटिया. विद्या भाटिया म्हणजे अहिराणी यूट्यूबवर राज्य करणारी महाराणी से. बाकी कलाकार बी मस्त सेत. दखा हाई क्लिप.
बापू हटकर.