गरीबनी खादा ते गू खादा नी नांदतानी खाये ते आवसद khandeshi Ahirani Letter
पिंकूताईले येडबाई आक्काना आसिरवाद Khandeshi Ahirani Letter
मायबोली अहिराणी भाषाना जागर
येडबाई आक्कानं पत्र,
पिंकूताईले येडबाई आक्काना आसिरवाद !
शुक्रवार दि. १०/११/२०२३
३० /१०/२०२३
येडबाई आक्कानं पत्र.
पिंकूताई तुन्हा पाव्हनासंगे मन्हा झगडा झाया च्यार दिनना पहले,
हायी दिवायीले माले पयठनी लेयी द्या म्हनीसनी मांगे लागनू बी व्हतू. त्या सांगाले लागनात यंदा पानीनी समदा सत्त्यानाश करी टाकेल से. खेतीवालास्ना तोंडनं पानी पयी गये. ढोरे पोरे कसा वाचाडाना, जगाडाना समजत नही. तुले मिरावाले, फिरावाले, तुम्ही हाऊस मऊज कराले मी काय ललित पाटीलना मायक कारखाना सुरु करेल नही से मरो पयठनी बाजुलेज हायनी मझारमा हाऊ कोन, कथाना ललित पाटील घुसी गया. मी इच्यारं म्हन्तं हाऊ ललित पाटील कोन से ? एकारधा कारखानाना मालक, मंत्री संत्री, पुढारी… ? त्यावर त्यास्नी सांग, येडबाई जाऊ दे ना ! तुन्हा डोकाना बाह्यरनी गोठ से ती ! मायबापनी मन्हं नाव येडबाई काय ठेवी दिन्हं… समदास्ले वाटस माले काय समज उमज नही से मी खरंज येडी से आसंज वाटस ना ! पन कायबी झाये तरी मन्हा डोक्सामा एकडावनं येडं घुसनं ते काहीबी करा पन निघत नही. मी बी ठरायीलिन्हं म्हन्तं माय या ललित पाटीलना आत्ता पत्ता नही धुंडी काढा पतायम्हायीन,तव्हय बोलानं.
दाजभाऊनी नात परी दिवायीले कालदिनज उनी. दुफारले मी बी दिवायीनी आवर सावर कराले घरज व्हतू. तव्हढामा परी मोबाईलनं डबडं हालावत उनी म्हन्तं परी तू त्या कारखाना वाला ललित पाटीलले वयखस का .. ? परीनी सांग ते आयकीस्नी मन्हा ते पायखालनी जमीनज सरकी गयी. दोन्ही भाऊस्नी नासिकना जोगे नशा येवान्या वस्तुस्ना कारखाना टाकेल व्हता. माय आवढा कारखाना टाका तवधुर कोनले काहीज समजनं व्हनार नाही का ? बरं जव्हय समजनं तव्हय त्या ललितले पोलीसेस्नीताबामा लिनं त्याले जेलम्हान टाकं जेलम्हायीन नाटके करीनी बेक्कार पुनामा आजारीनं नाटक करीनी मोठ्ठा हास्पीटलम्हान हायना ! आवढावरज त्याना परताप थांबना नहीत बरं. त्याले लगीननी बायको त्या भी एक का दोन त्यालेज माह्यती. दुसऱ्या दोन बिगरलगीनन्या न्याय! आजार नहीं तरीबी त्याले डागदरेस्नी हास्पीटलम्हान कसं ठेवं व्हीन ? मोठ्ठला हास्पीटलेस्मा नंबर लागतस नहीत. तठून तो त्यान्ह्या मैतरनीस्ले लयीसनी मोठल्या हाटलीस्मान न्हाये म्हने मुक्काम. आवढंज काय मोठमोठला माल म्हंजे त्या दुकाने हातस म्हने तठे जायीसनी त्याले पाह्यजेल ते इकत लेये. त्यानी एक मैतरीन ते वकील से म्हने कितली बिन आक्कलनी म्हनवा तिले. एक बायी म्हनीस्नी ते लाज शरम पाह्यजेल ना! आते पिंकूबाई, तू माले हायीज बोलसी ना, तुले जग दुन्यामा काय घडस त्यानं काय पडेल से ? कोनलेज कोन्हं पडेल नही, म्हनीस्नी ते दुन्यामा आवढं पाप वाढी न्हायनं ना? देवनी आवढा चांगला धडधाकट, हाटा कट्टा देह देयेल सये, तो काय निस्ता पोसासाठे का ? आते या ललितनी कारखाना टाका, कोन्ही मनासारखं रिकामी फुकट फौजदारी कराले जाता ते काय से काय नही समजी जातं ना!
काय व पिंकूबाई!
गरीब दुब्यासनी वडा पावनी चोरी कयी पोटसाठे तरी हाटेलवाला मर मर मारस नी पोलीसेस्ना ताबामा देस. वरथीन पोलीसबी त्याले ढोरसारखा मारतस चोरी कयी म्हनीसनी. कोन्हीज इच्यार करत नाही, त्यान्हा भुक्या पोटनी त्याले चोरी कराले लायी एक बी . सतीना लाल म्हनस नही, भाऊ तुले भुक लागेल से….. धर मी देस तुन्हा दोन वडा पावना पयसा. कच्ची वडांगवरज पाय ठेवता येस ना! या ललित पाटीलले जेलम्हानबी कोन्ही टोकं नही का रोखं नही. हास्पीटल म्हानबी तो त्यान्हा मनले पटीनं तसा जगत न्हायना वागत न्हायना. पिंकूबाई, आपला देसम्हान दोन परकारना कायदा सेतस का ? म्हंजे गोर-गरीब साठे, ज्यान्हा कोन्ही वाली नही, त्यास्नी एकारधी चुक, चुकीसनी कयी तरी त्यास्ले माफी नही. त्यास्ले सोडाले ना वकील ना कोन्ही पुढारी. पन या लखोपती, करोडपती काहीबी करथील तरी त्यास्ना डोकाना बालले कोन्ही हात लावानी हिम्मत नही. त्यास्ना मुंबई- पुनामा आलिशान घरे. एक पाय देसम्हान ते दुसरा परदेसम्हान. त्या कितला गुनना सेतस ते सांगाले वकिलेस्ना फौजफाटा त्या गुनन्या रकमा जठे जाधीन तठे या बातमीस्वाला, टीव्हीना कॅमेरावाला पेपरम्हान, टीव्हीम्हा आसा घडी घडी थोबाडा दखाडतस जसी यास्नी काही मर्दानगीनी कामगिरी करेल से का काय! त्यास्नी चावय त्यास्न्या रंग ढंगेस्नी चावय! मी म्हनस जेलम्हा टाकेलवर कायदाना हातमा देयेलवर त्यास्ले कितला लाड लचकम्हा कवतिकम्हा ठेवतस. दखीनी यकीनी डोकानं इंजिन बंद पड़ी जास. पिंकूबाई चोर ते चोर वर सिरजोर आसाज वागनं चाली हायनं समदीकडे, धिटायी खाये मिठायी नी गरीब गया लुटायी. कितला दिन आसं चालीन…? ज्यानं पाप त्याना पदरम्हा टाकाले नको का ? ज्यानं त्यानं नेमेल काम खरापनाम्हा कये ते आसं वकटं, बंगाय चित्तर तरी दिखाऊ नही ना. आठे बी तो ललित खरा आजारी से का नहीं ते कोन्हीज देखाले व्हतात नहीत का ? जर तो ज्यास्तीना आजारी से ते तो मैतरीनना संगे हाटेलम्हान कसा तरफडत जाये ? जेलम्हान मोबायल देल का ? नऊ-नऊ माना हास्पीटलम्हान ते मोठमोठला आजार व्हयेलबी कोन्ही राहत नाही. मंग हाऊ ललित दिन धव्वे समदास्ना डोयामा माटी फेकी हायना व्हता. ज्यास्ना डोयामा माटी जाये, त्याज तगारा भरी माटी त्यान्हा जोगे आनी देयेत. पिंकूबाई समदीकडे खोटं नाट मिरी हायनं हायी एक बात खरी से. गरीबनी खादा ते गू खादा नी नांदतानी खाये ते आवसद आसी जगनी तन्हा से. जाऊ दे माय डोकं निस्तं उफटं सुफटं कराले लागी गये. आन्यावले साथ देनारास्ना कलेजा कोन्ता दिन उफटा सुफटा व्हयी काय माह्यती ?
– तुन्हीज येडवाई आक्का – से.नि.प्राचार्य सौ. रत्नाताई पाटील, फागणे ता. जि. धुळे