खान्देश रतन महाराजा सयाजीराव गायकवाड
” फर्जंद ए खास दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर ”
आसी एवढी मोठी पदवी धारनं करनारा श्रीमंत सयाजीराव गायकवाड तिसरा (यास्न जनम नावं श्रीमंत गोपाळराव गायकवाड) ह्या सन १८७५ ते १९३९ साल दरम्यान बडोदा संस्थानना अधिपती व्हतात. त्यास्नी वयख आज आपुन करी ल्हीऊत.
नासिक जिल्हाम्हाना कौळाणा (ता.मालेगावं) गावले मेहरबान श्रीमंत काशिराव भिकाजीराव उर्फ दादासाहेब गायकवाड आनि श्रीमंत अखंड सौभाग्यवती उमाबाई ह्या मराठा कुंटंबम्हा सयाजीरावना जनम ११ मार्च १८६३ ले झाया. त्या श्रीमंत काशिराव गायकवाड यास्ना दोन नंबरना सुपुत्र.
बडोदाना महाराजा सर श्रीमंत खंडेराव (१८२८-१८७०) गायकवाड ह्या मरा नंतर त्यास्ना भाऊ मल्हारराव ह्या गादीवर यिथीन आसी आटकय व्हती. मातर त्यान्ही खंडेराव महाराज यास्ना जिवले धोका पव्हचाडानं कारस्थान कय व्हत. त्यामुये त्याले अटकभी व्हयेल व्हती. तसज गंगा भागीरथी जमुनाबाई (१८५३-१८९८) तव्हय दोनदिशी/गरोदर व्हत्यात नी त्यास्ना पोटम्हाना बायनं लिंगनिदान भी व्हयेल नव्हत त्यामुये राजगादीना निर्णय व्हयेल नव्हता. थोडाज दिनम्हा जमनाबाईनी ५ जुलै १८७१ ले पोरगीले जनम दिन्हा. त्यामुये मल्हारराव बडोदा संस्थानना राजा झायात. मातर मल्हारराव यास्नी उधयपट्टी सुरु कयी. मल्हाररावनी मोतीस्ना गालीचा आनि निख्खय सोनान्या दोन तोफा बनाड्यात याम्हा संस्थाननी संपत्तीन मोठ नुकसान झाय.हायी आपली चूक दपाडासाठे त्यानी आर्सेनिक संयुगना इषप्रयोग करी इंग्रज रेसीडेंटले ठार मारानी कोसिस कयी. त्यामुये १० एप्रिल १८७५ ले तव्हयना भारतसचिव लाँर्ड सँलीस्बरी यान्ही मल्हारराव ले राजगादी वरथाईन खाले उतार. राजगादीवर कोन्हीज बसू न सकामुये महारानी जमनाबाईनी त्यास्ना समधा परगना परमुखेस्ले गायकवाडेस्ना जवयना भाऊबन / वारस सोधाना कामले लाव. गायकवाडेस्नी यक शाखाना वंशज कौळानाले स्थायिक व्हयेल व्हतात त्यास्नी तठली पाटीलकी इकत ल्हेयेल व्हती आसा तपास लागना.आस सांगतस. कौळानाथाईन काशीराव गायकवाड ह्या आनंदराव, गोपाळराव आनि संपतराव या आपला पोरेस्ले ल्ही तिन चारसे किलोमीटर वरथाईन बडोदाले उनात. तठे मुलाखतना येयखे बडोदाले काबर उनात ह्या प्रश्ननं ” मी बडोदाले राज्य करासाठे उनू ” आस रोखठोक उत्तर दी गोपाळरावनी निवड समितीन मन जिकी ल्हीध. राजा बनानी परीक्सा पास झायात.
महारानी जमनाबाईनी गोपाळरावले २७ मे १८७५ ले रितसर दत्तकविधान करी त्यान्ह सयाजीराव आसं नामकरन कय. कायदानुसार सग्यान व्हवावर २८ डिसेंबर १८८१ ले त्यास्ले संस्थानना पुरा आधिकारी बनाड. सन १८७५ ते १८८१ लोंग सर टी. माधवराव यास्नी सयाजीरावले राज्यकारभारन शिक्सन दिध. गादीवर येवावर सयाजीरावनी राज्यनी आर्थिक घडी बसाडासाठे उपाययोजना कयी. प्रशासकीय जबाबदारीनी इभागनी करी राज्ययंत्रनाम्हा सुरयीतपना निरमान कया. सल्लागार नेमीसन कल्यानकारी योजना सुरु कयात (१८८३). न्यावयेवस्थाम्हा सुधारना कयात, ग्रामपंचायतीस्न पुनरुज्जीवन कय (१९०४). तसज सक्तीना प्राथमिक सिक्सन सुरु करनार बडोदा हायी पह्यल राज्य ठरन(१८९३). तसज आख्खा भारतम्हा मोफत आनि सक्तीनं सिक्सन लागू करनार पह्यल राज्य ठरनं (१९०६). गरीब गरजू इद्दार्थीस्ले शिष्यवृत्ती दिसन उच्च सिक्सननी सोय कयी. औद्योगिक कलासिक्सनसाठे ‘ कलाभुवन ‘ हायी संस्था स्थापन कयी. त्यास्नी ‘ प्राच्य विद्दामंदिर ‘ ह्या संस्थाना वतीखाल जूना प्राचीन ग्रंथेस्न संसोधन आनि प्रकाशन कराले उत्तेजन दिन्ह. सयाजीरावनी श्रीसयाजी साहित्यमाला तसज श्रीसयाजी ज्ञानमाला ह्या दोन मालाज मार्फत चांगला ग्रंथेस्ना भाषांतरे प्रसिद्ध करात. त्यास्ना बडोदा संस्थानम्हा गावेगाव वाचनालये स्थापन कयात. फिरता वाचनालयेस्नी सोय कयी. त्यास्नी त्या कायम्हा इंग्लंड अमेरिका सारखा देसेस्ले भेट दिन्ही. तठली शिक्सन पध्दत आनि ग्रंथालय दखिसन परभावीत झायात. त्यास्नी ग्रंथालय तग्य बार्डनले भारत बलाय. त्यान्हा मार्गदर्शन म्हा संस्थानम्हा ग्रंथालये सुरु कयात.महाराजा सयाजीराव गायकवाड यास्नी सोता ग्रंथालय शास्रानं सिक्सन ल्हीध व्हत. खरा आर्थाखाल त्या भारतीय ग्रंथालय शास्रना जनक व्हतात.
सामाजिक क्षेत्रम्हा सयाजीराव यास्नी करेल कामे त्यास्ना सामाजिक सुधारनास्ना साक्स सेत. पडदापध्दती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रय बंदी, मिश्रविवाह पुरस्कार, बायास्ले वारसाहक्क मियाडी देनं, अस्पृश्यता निवारनं, विधवाविवाह ह्या सारख्या सुधारना संस्थानम्हा कयात. घटस्फोट बाबतना कायदा हाऊ त्यास्नी भारतम्हा पहिलांदा कया. हरीजनेजसाठे आठरा साया काढ्यात(१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यास्ले सिक्सन साठे शिष्यवृत्ती दिधी. परदेस सिक्सनसाठे मदत कयी तसज बाबासाहेब यास्नी संस्थानम्हा मोठा पदवर नेमनूक कयी. ह्या सामाजिक सुधारना करामुये त्यास्ले राष्ट्रीय सामाजिक परिषदना अध्यक्षपदना मान भेटना (१९०४).
बडोदा हायी कलापूर्ण प्रेक्षणिय नगरी ठरनी यान्ह कारनं सयाजीराव यास्नी बांधेल सुंदर सुंदर वास्तु इमारती. लक्ष्मीविलास राजवाडा,वस्तुसंग्रहालय, कलाविथी, श्री सयाजीराव रुग्णालय, नजरबाग राजवाडा
महाइद्दालयनी इमारत ह्या त्यास्नी बांधेल वास्तु बडोदान सौंदर्य वाढायी राह्यन्यात.सयाजीराव यास्नी २० जुलै १९०० म्हा बँक आँफ बडोदानी स्थापना कयी. त्यास्नी देयेल निधीवरज हायी बँक उभी राह्यनी.
सयाजीराव हरेक गोटन दूरदृष्टी खाल नियोजन करेत.त्यास्न नियोजन आनि येवस्थापन यकदम अचूक राहे. सयाजीराव जनताले मदत करेत तव्हय जनता स्वावलंबी कसी व्हयी हायी दखेत. शंभरसाल पह्यलेंग सयाजीराव यास्नी बडोदा आनि आजुबाजूना जिल्हाजम्हा येयेल पूरमुये उदभवेल संकटम्हा भारी व्यवस्थापन करीसन जनताले दिलासा दिन्हा. संस्थाननी समधी यंत्रना कामले जुपी लोकेस्ले मदत पव्हचाडी. जनतान भल करन इकास करनं हाऊज मन्हा जिवनना ध्यास से आसं त्या म्हनेत. शेतकरीस्ले दुस्काय आनि अतिवृष्टी कायम्हा त्यास्नी मदत कयी. बडोदाले जुलै १९२७ म्हा मोठ्ठा पूर उना व्हता. तव्हय चार दिनम्हा नेहमी पक्सा जादा पाऊस पडना. बघोडीयाम्हा ५५ इंच पाऊसनी नोंद व्हयनी. नदीनालास्ले महापूर उना. हायी समध अचानक घडनं. लोकेस्ले आपला जिव वाचाडासाठे आपला घरेदारे ढोरे,पैसाआडका सोडीसन पयी जानं पडनं. तव्हय संकटेस्नी सूचना देवासाठे सोय नव्हती. जी व्हती ती संपर्क यंत्रनाभी कोलमडनी. कोनता भागम्हा कितल नुकसान व्हयन हायी समजाले थोडा ये लागना. मातर संस्थाननी यंत्रना ह्या संकटम्हा कंबर कसी कामले लागनी. पह्यलेंग येगयेगया भागम्हा पूरम्हा आटकेल लोकेस्ले सुरक्षित जागावर हलाव. कमीतकमी नुकसान कस व्हयी यान्हाकडे ध्यान दिध. उपाययोजना कयात. संस्थानजोगे व्हतात त्या साधने वापरीसन स्थिती पह्यलासारखी करानी कोसिस कयी. निराधार बेघर लोकेस्ले तात्काय मदत कयी. संस्थन कडथाईन लोकेस्ले तातडीनी मदत म्हनिसन ५० हजार रुपया मंजुर कयात. यामुये जनताले दिलासा भेटना.
सयाजीराव यास्ले परवासनी भलती आवड व्हती. त्यास्नी जगभर परवास कया. जठे जठे जे जे चांगल व्हयी ते ते चोखंदयपनाखाल आपलस करी संस्थानना इकास कराना प्रयत्न कया. लंडनले भरेल पहिल्या दोन गोलमेज परिषदास्ले त्या हजर व्हतात. लोकमान्य टियक, बाबु अरविंद घोष यास्नासंगे त्यास्ना जोगेना संबंध व्हतात. सन १८८६ म्हा यक समारंभम्हा त्यास्नी जोतिराव फुले यास्ले ‘ महात्मा ‘ हायी पदवी दिन्ही. राष्ट्रीय आंदोलनले त्यास्ना छुपा पाठींबा व्हता. सिक्सन सुधारना, समाजसुधारना, सिस्तना कारभार ह्या समध्याज बाबीजम्हा त्या यसस्वी झायात.
” हिंदूस्थानातील शेवटचा आदर्श राजा ” ह्या सब्देजम्हा त्यास्न उचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यासनी करेल से. मुंबई ले ६ फेब्रुवारी १९३९ म्हा ह्या महान दानशूर राजानं निधन झाय. असा कर्तबगार राजा श्रीमंत सयाजीराव महाराज यास्नी जनम भूमि खान्देश व्हती आपले हायी गोटना आभिमान वाटस.
श्रीमंत सयाजीराव महाराज यास्ले कोटी कोटी नमन.
रमेश बोरसे
धुळें