किदर बी दखना नी एक डोया हेकना मराठा आरक्षण
महाराष्ट्र मजार मराठा आरक्षण हाऊ मुद्दा भादवा न उन सारख जस तपेल शे, तसाच काही भादवाना किळा बी इरोध करा करता वयवय करी ह्रायनात. तेन्हा मजार ताे गु.. रत्ने… जास्तच वयवय करी ह्रायना. मराठास्नी तेन्ह काय घोड मारेल शे, म्हनीसन हायी फुरगदड फुरफुर करी ह्रायन. आते हाऊ रात दिन फुरगदड मजार ह्रास… आक्कल बी तशीज ह्रायीन..
बय बाकीना ते आसा शेत, त्या आरक्षण ना फायदा उचली ह्रायन्हात, पण मराठा आरक्षण मांगी ह्रायन्हात ते ह्या बांडगूळ गांड म्हायीन वकी ह्रायन्हात… मराठा हाऊ कुणबीच शे, हायी त्रिवार सत्य शे, जयगाव, धुये, नंदूरबार मजार आज बी ८० टक्का मराठा कुणबी पाटील शेत, तश्या नोंदी सापडतीस… इंग्रज गॅझेट, मोडी लिपी मजार सुध्दा नोंदी शेत… तेन्हाज आधारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर येस्नी कुणबीस्ले आरक्षण देल शे. बर जी आवस्था बाराबलुतेदार, नी आठरापरगडजातीस्नी अवस्था शे, तशीच अवस्था आजबी ८० टक्का मराठास्नी शे, मंग तेस्नी मुख्य प्रवाहामजार येवु नये का? १० ते १२ टक्का मराठा प्रस्थापित शेत, मंग ह्या ८० टक्का विस्थापित मराठास्नी आते सामुदायिक आत्महत्या करानी का? आरक्षण म्हणे शिक्षण पुरत ह्रास… आजिबात नही, परतेक गोष्टीस्मा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मजार आरक्षण ना फायदा शे… बर भो आम्ही तुम्हण्या थाटीस्मा चेंदाले यी ह्रायन्हुत नही, कोणताच घटकले धक्का न लावता आम्ले आरक्षण द्या.मंग तेन्हामा मराठा समाजनी मांगनी काय चुकीनी शे. बाकी घटक आजबी ntvjnt म्हायीन st मजार जावा करता आंदोलन करी ह्रायन्हात, काही घटक sbc म्हायीन st मजार जावा करता लढाई करी ह्रायनात, मराठा आंदोलक म्हणतस दुसरास्न नुकसान करीसन आम्ले आरक्षण नको, मंग दादास्वन कसाले मराठा आरक्षण वर वकतस, देण, नही देण, हायी सरकार आणि कायदा दखीन ना भो.
आज त्या एक फुरगदडानी पयदास्नी म्हणे कोर्ट मजार मराठा आरक्षण, नी आंदोलन ना इरोध मजार रिटपिटीशन दाखल करीम्हणे. हाऊ गु… त्ने… दखस कथा बोलस कथा, किदर बी दखना नी एक डोया हेकना… मराठास्ना सातीवर हाऊ कुदेल शे… तेन्हा हिसाब देवबा करीनच.ये उन्ही ते मराठा बी करतीन.
मा मनोज जरांगे पाटील हाऊ माणुस मराठा समाजना फकीर आंदोलक शे, मराठा आंदोलन करता घरवर तुयसी पत्र ठेल शे येस्नी. इस्टनबारदान फुकी टाक दादा नी मराठा आरक्षण करता… नी समाज करता. पण आज हायी आंदोलन हिंसक वयन ले येल शे, ते आजिबात समर्थनीय नही. तेन्हा मांगे कोटी कोटी ना मुक मोर्चा निंघनात, मराठा समाजनी सरकार, समाज, कोणच मालजाल न नुकसान कय नही. ते मराठा समाज ना रंगत मजार नही. पण काही राजकीय पुढारी राजकारण करीसन माथा भडकायी ह्रायन्हात, तेन्ह निषेध करो तितल कमी शे.आज नही ते कालदीन मराठा आरक्षण सरकारले देण पडीनच, नही ते भविष्य मजार मराठा समाजले आवरण मुश्कील व्हयीन.
एक मराठा लाख मराठा