एक बाई शिकनी आख्खं घर शिकस अहिराणी लेख

एक बाई शिकनी आख्खं घर शिकस

एक बाई शिकनी आख्खं घर शिकस अहिराणी लेख

माले चांगली याद शे . मी धाकला व्हतु बाया पह्यले नदीवरच धोनं धवाले जायेत बरं ! तवय नदीले महामूर पानी राहे . आते तं पानकायामा बी नद्या कोल्ल्या खटक वाहयतीस . पन मी काय म्हनस बहिनीसहोन आनी भाऊसहोन पह्यला दिन याद कयात ते जमीन आस्मानना फरक शे . बाईना जातले आंधारामा उठा पासून ते रातले जीमीनले पाठ लागा लोंग काम काम कामच राहे हो .. आनी अवजड कामे करना पडेत हो ss ..! निदान तुमले माहित ते व्हई आतेना नवा पिढीना पोरीसले सांग ते पटान नई मायन्यान कदी भो . तवय पीठ दयान्या चक्क्या कथ्या व्हत्यात हो ? बये झापाटामा उठीसन घट्यावर दयन दयनं पडे . तवय कोठे मेंगरा खावाले भेटेत आनी तवय कोठा पीठ दयान्या चक्क्या व्हत्यात हो ? व्हतात का ‘ ? माले काई कथ्या दखायन्यात नई भो . अहो घरोघा मोठमोठाला घट्या राहेत . दगड ना घट्या राहेत . अजुन कथा मथा दखावतस. त्या घट्या म्हंजी काय साधा सुधा राहेत का हो ? दोन दांडग्या दुंडग्या बायासवर व्हढाव नई एव्हढा दांडगा घट्या राहेत . जड बद्दक . कशीका थंडी कुमचाडेना पन बाया अंधारामा उठीसन घट्यावर बशी जायेत हाई गोट मातर खरी बरं ! आव्हढा थंडीमा बी त्या घामाघूम व्हई जायेत. साधासुधा घट्या राहेत का त्या .. ? पन बाया अंधारामा दयन दयता दयता वव्या म्हनेत . गाना म्हनेत ते दयन कथं दयायी झाये त्याना पत्ताच नई लागे . सक्कायमा आखो दुसरं काम राहे . चुल्हा पेटाडाना . काड्या ‘ कुड्या पयखाट्या सोयता वावरमा जान पडे . कचरं येचनं पडे ‘ पयखाट्या माझ मझारना वावरमा घुशीसन तोडन्या पडेत . हातले व्हडी व्हडी फोडे इ जायेत म्हंत . त्यानावर पानी गरम करनं पडे . तवय आत्ते ना सारखा गॅस कथा व्हता हो ? मंग पानीनं आंधन उतराई गयं का मंग त्यानावर तवा ठिसन बाजरीन्या पीठन्या भाकरी थापायेत . अहा हा … त्या भाकरी शेकाना मायन्यान भो काय सुगंध राहे. आख्खा घरमा पसरे तो . आनी भाकरी थापाना थप थप मा मी ते उठी जाऊ भो . मंग त्यानावरच बट्टा बुट्टानी डबुक वड्यासनी भाजी वड्या ‘ नई ते पाटोड्यासनी भाजी व्हई जाये . वावरेसम्हाईन भाजीपाला उनात व्हतीन ते ती बी श्याक व्हई जाये . पह्यले कपडा ते नदीवरच धोवाले जान पडे म्हना . तवय कपडा धवाले काय रिम नी पावडर ‘ साबुन राहेत का ‘ रिठ्ठानं पानी करानं कपडा भिजाडाना आपटी उपटीसन निपई नुपई घर लई येवानात . आतेनी गोट ते नका इचारा गड्यासहोन . बये काय काय कितला परकारना साबुन दखावतस. नुसता येडा चाया शे हाऊ . डोकाना शाम्पु बये शिकाकाई ना पानी मा बाया डोकं धोयेत . तवय माटीना घरे राहेत . माटीना भिती राहेत गढी वर जाईसन कढईमा माटी आननी पडे बाईना जातले आनी त्याच माटीवर घरन्या भिती लिपना पडेन म्हंत . आनी ढोरेसना मव्हरेनं शेन वर घर सारनं पडे . त्याच शेन वर भितीसवर शेनन्या गवऱ्या लिपन्या पडेत . गवऱ्या सुकायन्यात म्हंजी चुल्हा पेटाडाले ‘ पानी गरम कराले उपयोगी पडेत . कव्हढा मैझारा बाईना जातले पुरे हाई तुमीच दखा आते . बाईना जातले भलतं काम पुरे हो . तिले आराम कराले भेटे ? नाव नका सांगा हो . अज्याबात नई बरं । मंडई हाई सोडीसन बोला . दुपारना भर आंग टाकानं म्हंशात ते ये कोठे राहे हो ? सासू लगेच अल्लाये ” वं पोरी ‘ भांडा घसाई गया व्हतीन ते हाई जुव्वारी ले ऊन दखाड ते जरासं . नई ते काय व्हस माय वं तिमा कानी धनुर पडी जास वं .. नई न्याहाऱ्या बांधीसन तीन तीन कोस पायी गाड् भेटनं ते ठिक नई त ढांगे ढांग घानपानी ना नई ते बल्ला सना वावरेसमा निंदाखुपाले जानं पडस बाईना जातले . काय करो ? तवसामा घर येत येत अंधारं पडी जास . दिवाबत्तीनी ये व्हई जाये . ती बी चिंता बाईनाच जातले . तवय घाकलशी चिमनी राहे ‘ नई ते कंदील राहे . त्यामा रॉकेल वतनं पडे आनी मंग त्यानी वात वर करीसन तो पेहाडना पडे . आते तं काय लाईटन बटन दाबताच झगमगाट व्हई जास हो . दारन ना आंगे दिवा लावना पडस . हाई आपली संस्कृती शे .लक्श्मी येवानी ये ऱ्हास अशी पक्की समजुत शे . तुमशील दिवा लावना पडस . हाई रोजना नित्य काम ऱ्हास यामा कध्धीच तुमीन म्हंशात ना खंड म्हंजी खंड च पडाव नई आनी बाईना जातले या गोट ना इसरबी पडाव नई हाई गोट मातर खरी बरं । यालेच आपला संस्कार म्हंतस वाड वडिलेसनी लाई देल शे . दारना मांग मोठ्ठाला आड राहेत . आडवरथीन पानी काढनं पडे . दोर व्हढाले बी ताकद लागे म्हंत ..! चुल्हा म्हाईन वल्ला बयतनना धूर निंघे बाई नी जात फुकनीवरी फूकी फुकी येडी व्हई जाये हो . मायन्यान कदी भो तिना डोया लाल जरत व्हई जायेत. आनी एव्हढ करीसन तवय कोनताच बाईले बी पी नी एक बी गोयी नई लागे मंडई . कोनले डायबिटीज नई . तवय इतला डाक्टरेस ना दवाखाना बी कथा व्हतात हो ? चुल्हा फुकी फुकी डोया चूर चूर करेत त्या धुक्कयमा पन कोतांच बाईले तवय चष्मा लागना व्हई माले ते काय कदी दखायनं नई भो तुमले दखायनं व्हई ते कोन जाने ? तवय लुगडा बी असा साधा सुधा राहेत हो . आते ते ईचारू नका चमचमाट ‘ काठेपदरना रंगबेरंगी ‘ येलबुट्टी नक्शीना आते नी गोट काय इचारतस हो ? तवय वरीसमा एकचदा लुगड भेटे . ते बी दांडे करी करी वावरेसमा कामेसले बायासना मव्हरे जानं पडे . दुपारना भर बाई कदी घर राह्यनी आनी ती आंग टाकी नाव नका सांगा दुपारना भर ती झावरी ‘ पथोरल्या ‘ बायतोडा ‘ शिवाना कामे काढस . आते बठ्ठ चिलंतर बदली जायेल शे . दयाले मिक्सर दोन मिनीटमा मसाला वाटीसन तयार . पह्यले वाटा वरवंटा शी वर बसनं पडे . आते गय ते . ग्राईंडर घरमा ऊना . घरोघर लाईट टीव्ही . रेडिओ कॉम्प्युटर सिमेंट टाईल्सना घरे नुसता बोलाले करतस. कव्हढा फरक शे हाऊ ? दखाना हो ? आते इले . मोटर वर डायरेक्ट घरमा माथनी मा पानी ल्या ना हो तुमीन आते आडवर जावानी दोर व्हडानी काय गरज शे ? आते बाई धोनं धवाले कसाले नदीवर जाई ? जाई का ? कसाले जाई हो ? दयन दयाले जात नई नी आते घर बनीसन बी खरेदी व्हस ऑन लाईन का काय म्हंतस ते . नई ते मॉल मा जावानी फैशन शे . नवराना पैसाना चुराडा . पन आते काय शे मंडई हाऊ इनोदना भाग सोडी द्या . आते हाऊ बदल बठ्ठा सिक्शन मुये झाया बरं ! शिक्सन मुये परगती झायी . पोरी शायामा जावाले लागन्यात . हाऊ क्लास तो क्लास त्या पोर ले गौर मांडाले ‘ आखाजीना पानीले जावाले कोठे ये शे हो ? ती सक्काय व्हताच सायकल म्हना स्कुटी म्हना कीक मारी का चालनी क्लास ले चालनी कॉलेज ले . आते पारंपारिक सन उत्सो ‘ गाना ‘ हाई बठ्ठ मांगे पडत चालनं . पन हाई एक ईचार कये ते चांगली गोट शे मंडई . प्रगती शे . सिक्सन मुये घर नी ‘ गावनी देशनी प्रगती व्हस हाई पटाले लागनं . आते बाया प्राध्यापिका शेत ‘ शिक्षिका शेत ‘ बायासले वाटस आपला पोरगा चांगला शिकाले जोयजे त्याले मोठी नोकरी भेटी कारन शिक्सन शिवाय पर्याय नई हाई बायासले कयाले लागनं . शिक्शनमा चढाओढ सुरु झायी मंडई . पोरेसनी माया च तयारी करतीस . त्यानं दप्तर ‘ पुस्तके ‘ वह्या ‘ पानीनी बाटली ‘ डबा टीफीन मायच बठ्ठी तयारी करस आनी स्कुटर म्हना ‘ रिक्शा म्हना स्कूल बस म्हना त्याले शायामा धाडस . त्याना आभ्यास लेस . चौकशी करस . कारन तिले शिक्सन न महत्व कयनं . कारन ती स्वोयता शिकेल शे . आते ती पन ग्रॅज्युएट व्हयेल शे . पोरे शिकी सवरी मोठा पदवर जावोत हाई तिनी कायपात दखाई राहयनी . कारन आत्ते नी बाई या शिक्सन मुये मानसेसना खांदा ले खांदा लाईसन शिकी राहयनी . नोकरी करी राह्यनी . इंजीनियर ‘ वकील ‘ डॉक्टर ‘ पायलट सगया क्षेत्रासमा बाई आते आघाडीवर शे . चुल्हा फुकनीवर ती नई फुकत नई आते ती दुसरासना वावरेसमा निंदा खुपाले जास . आते तिले शिक्सन नं महत्व कयाले लागनं . तिले कोनी तरी वाघीननं दुध म्हनेल शे ते काई खोट नई . बाया आते पंतप्रधान ‘ देशना अध्यक्ष ‘ डॉक्टर वकील ‘ राष्ट्रपती कव्हढी घोडदौड सुरु शे हो ? हाऊ बठ्ठा चमत्कार पाटी पेन्सिल ना शे . धाकलपने पाटी पेन्सिलनं येड लावं की पोर आपली परगती करस . आख्खं घरनी परगती करस ‘ गावनी देशनी परगती करस . भाउसहोन सावित्रीबाई फुले ‘ ह्या पहिल्या शिक्षिका व्हत्यात म्हनीसन हाई क्रांती हाई आपले इसरता येवाव नई . आते फकस्त शाया ‘ कॉलेज ‘ ऑफिस ‘ कॉम्प्युटर ‘ लैपटॉप ‘ आनी नोकरी नी धावपय बाया बठ्ठ्या क्षेत्रामा आघाडीवर शेत . त्यासना पोरे शिकी सवरी हफीसर वकील डॉक्टर इंजिनियर व्हई राहयनात दखीसन आनन वाटस . म्हनीसन पहयले घरनी बाई शिकनी जोयजे . मंग मस्त लाईन बसस . परगती व्हस . घरना विकास व्हस . घरमा आनन पसरस . देशना विकास व्हस . म्हनीसन म्हनेल शे कोनी तरी आपुन नई म्हनेल बरं ! घरमा जर आधुनिकरण आनानं व्हई ‘ अंधश्रद्धा दूर करानी व्हई ‘ घरमा सुख शांती व बुद्धी प्रांजल्य घरमा वाढावनं व्हई ते मुलीस ना शिक्सन कडे जबाबदारी खाल लक्क्ष देवाले जोयजे . भाउसहोन म्हनीसन म्हनेल शेच … ” एक बाई शिकनी ते आख्खं घर शिकनं ” असं तुमीन नक्की समजा .. । विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343 ……