खान्देशी अहिराणी कवीता उना उंढाया
उना तडत उंढाया मन्हा खान्देसम्हा
ऊना तडतडत आनि भगभगत उंढाया,
मन्हा खान्देस लागना तपाया तपाया||धृ||
उन खेवाळत खेवाळत आंग खांदावर,
जसं पूनीनं चांदनं पंघरीसन डोकावर,
जथ्यातथ्या पसरन्यात आंगनभर,
मन्ह्या माया बहिनी भाहीर भाहीर.
उना तडतडत आनि भगभगत उंढाया ,
मन्हा सोनाना खान्देस लागना तपाया ||१||
आंगनेस्म्हा कुल्लया पापडे रहायनात सुकाई,
कोन्ही भल्लेल दाया रहायन्यात उडाई.,
कोन्हं दायासाया धान्य रहायनं सुकाई,
मावल्या तेस्नाबरोबर रहायन्यात भुंजाई.
उना तडतडत आनि भगभगत उंढाया,
मन्हा सोनाना खान्देस लागना तपाया ||२||
जीव रहायना नही मन्हा गप्प गप्प,
फोटुकं काढात मी गल्लीम्हा सपासप,
हायी जुनी संस्कृती माव्व्याना पयले,
ध्यानमान ठेवा कयाले पायजेल नयी पिढीले.
ऊना तडतडत आनि भगभगत उंढाया ,
मन्हा सोनाना खान्देस लागना तपाया ||३||
नयीन पिढीले मन्ह से हात जोडी सांगस आयका,
निव्वय दुसऱ्या भाषासनाज नांदे लागू नका,
अहिरानीमाय जपा,निदान घरमा बोला,लिखा,
सात भाषा मिसन बनेल हायी रानी इसरु नका.
उना तडतडत आनि भगभगत उंढाया.||४||
रचनाकार
मझिसु प्रा.मगन सुर्यवंशी.
