अहिरानी माय मावलीना जागर खेसरगम्मतवरन्हा लेख

अहिरानी माय मावलीना जागर खेसरगम्मतवरन्हा लेख

हावू एक, एकशे एक टक्का खेसरगम्मतवरन्हा लेख शे, आन बठ्ठा खेसरगम्मतम्हाज लिखेलबी शे मायन्यान भो! सिवाय एकहाजार एकशे एक टक्का काल्पनिकबी शे! पन जर चुकीसनी याम्हातली एखांदी खेसरगम्मत तुम्हनावरच लिखेल शे आशे जरका तुम्हले वाटी-चाटी चुटी ग्ये, ते तो दोस मातर मन्हा नै शे, हाई मी तुम्हले पह्यलेन पह्यलेज नेम्मन जताडी देस हौ! नै ते तुम्हीन म्हनश्यात का बैजू सलं! हाई ते हंड्रेडपरसेंट आप्लेज लागू पडंस. आते तेले काही ईलाज शे का? बोला!
मुक्काम पोस्टं- बेलदारवाडी, वायबार गल्ली, नवागावना हेटला आंगे, जिभाऊनी पानटपरीना मांघे
ता. दाभाडी, जि. उचकेलवाडी.

भावड्यास्होन नमस्कार!

कशा शेतंस तुमीन? मज्याम्हा शेतंस ना?( माले म्हाईत शे तुम्हीच नै तुम्हना गावना सम्दा टुक्कार कुतल्लासफाईन ते त्या तुम्हीन मोकाट सोडी देयेल गावड्या काही त्येसन्या त्या रिकामटेकड्या मारक्या-वास-या आन हातम्हा नवकरी-कामधंदा याम्हातलं काही म्हन्ता काहीच ज्यासनां फुटीसनी ठिकरा ठिकरा पडी जायेल नसीबम्हा नै शे, आसा गावभर डवरत फिरन्हारा त्या जान जिवान पोर्हे आन तरीसुद्धा त्येसनावर जीव ओवायन्हा-या समजदार, जिगरबाज तीकदार पन, बिन लगिनन्या पोर्ही आशी कोन्ही कोन्हीज कंडीशन बरी नै शे, हाई माले पक्क म्हाईत शे, पन आपला वाडवडलेस्नी जी रितभात लाई देयेल शे ती कशीकाय ईसरसूत बरं आपन?


कालदिन त्या कुंभारगल्लीम्हातला फेटेवाला गोपीच्यंद म्हतारलेबी मी हामेशाना रितरिवाज आन शिरस्ता परमाने आशाज प्रश्न ईच्यारा, “काय गोपीच्यंदआप्पा कसा शेतस? सम्द कसं नेम्मन चाली र्हायनं ना?”तसं दखाले गये ते मन्हा हावू प्रश्नच चुकाई जायेल व्हता कारन, त्या गोपीच्यंद फेटेवाला म्हतारानी त्येन्हाथीन दाहा वरीसथीन धाकली पन, बठ्ठा हाडेकुडे गोया व्हयेल, तोंडनं बोयकं व्हयेल, गालेसनं चिप्पाड व्हयेल आन नवराथीन पंधरा वरीस मोठी दखाये ती धल्ली म्हनजे त्येन्ही आस्तुरी देवघरे निंघी जायेल व्हती म्हने, पन माले याम्हातलं काहीच मालूम नै व्हतं! म्हनीसनी मी गोपीच्यंद आप्पाले सहज बोलनू. पन त्या म्हतारानी काहीज मनवर ल्हिनं नै. वरथून तोच माले बोल्ना, “शिवाजीआप्पा! आपली कंडीक्सन एकदम चांगली शे! काही म्हन्ता काहीज तरास नै शे आपुनले.

मस्त आपलं आपलं न्यारं र्हाईसनी एक टाईम सयपाक करो आन तीन टाईम तेच मेंगड्ल दाबत र्हावो!” हाई आयकीसनी माले प्रश्न पडना का हावू म्हतारा यायम्हा तीन टाईम जेवस म्हनीसनी नव्वदना वर निंघी ग्या! आन सलं आपन ते यायम्हा दोनच टाईम जेवतंस. कधी कधी ते पोट खराब र्हायनं ते सलं एकच टाईम जेयेलबी नै पचस! आपलं काही खरं नै भो! पुढे तो म्हतारा बोलना, “तुम्हनी मावशीले ते मन्हा वज्जी कटाया ई गयन्था म्हनीसनी ती माले आसा एखला टाकीसनी पुढे निंघी गयी देवघरे!”


गोपीच्यंद आप्पानतेस्नं हाई बोलनं आयकीसनी मी मन्हा मन्हा मनम्हानज आसा पस्ताई गवू का काही बोलानं कामज नै! दुसरी गम्मत ते येन्हाथीनबी भारी शे. जराखा मव्हरे तथी खाल्नी गल्लीम्हा मन्हा ताथ्याना (वडीलना) दोस्तार र्हातंस त्या दौलतनानाकडे गवू , त्येसनी लगेज मन्हीच ईच्यारपूस, काही खबरबात म्हाईत करागुन्ता गुगली टाकेलसारखा मालेज प्रश्न ईच्यारा. म्हनतंस कसा , “कारे ओS शिवाजी! कसंकाय चाली र्हायनं?”त्याव्हर दौलतनानाले मी बोलनू, “नाना! बठ्ठं काही नेम्मन शे, पन मांघना साले मन्हा ताथ्या जाता र्हायनात, हाई तुम्हले म्हाईत शे का नै?”याव्हर उत्तर देवागुन्ता दौलतनानानी आव दखा ना ताव आन नेहमीना रातरिवाजपरमाने त्या झटकन्ही बोली पडनात, “आरे व्वा सलं! हाई ते भू चांगलं व्हई ग्ये! दौलतनाना आसा काबरं बोलना आशीन आसा मी ईच्यारच करी र्हायन्थू तवशीन दौलत नानाच मव्हरे बोलाले लागनात, “शिवाजी! धर्मादादा जाता र्हायना हाई एक परकारे बरंच व्हयनं बरका! तो मन्हाथीन आठ दहा वरीस मोठा व्हता. हाई दख मन्हावरी आजिबात बठनं-उठनं व्हस नई तव्हय तुन्हा म्हतारानी कंडीक्सन कितली डेंड्रस व्हई जायेल व्हई नै का? सुटना बिच्यारा एकडावना ह्या मायाजायम्हाईन!”हाई आयकीसनी मी ते निरानाम खिसाना खिसाना हुईसन


दौलतनानाना निरप ल्हीसनी तठीन काढता पाय ल्हिना नि सीद्दी बेलदारवाडीनी हेटनी गल्लीनी वाट धरी, ह्या गावना लोके कसा चावय कर्थीन आन कसा नई यान्हा काही नेमच नै र्हायेल शे, म्हनीसन म्हन्त चला निसटा आते आठून. आवशीन कार्यकरमनी येयबी व्हत उन्थी. लाउडस्पीकरना भोंगाना आवाजवरी कान फुटी जाथीन का काय आसं वाटाबिचूक नै र्हायनं माले. तसं दखाले गये ते त्या गावम्हा लाऊडस्पीकरनी काहीच गरज नई व्हती. गावम्हालाग्सा दवंडी देन्हारा एक ठायके हुबा र्हाईसनी दवंडी देस तधंय त्येन्हा एखलाना आवाज बठ्ठा गावले ठाकबन आयकू येस. पन आम्हना बहाद्दर साहित्यिक कवी, लेखक, गीतकारेसले बैझू त्या लाऊडस्पीकरसिवाय भागस का? आजिबात नई हो! आजिबात नै! कार्यकरमले पुरापाठा ईस पंचीस लोकेबी नै र्हाथीन पन लाऊडस्पीकर जोयजे म्हन्जे जोयजेलच! त्या लाऊडस्पीकरनी बी आखो नारीच गम्मत शे! जो येस तो त्या माईकवर, “हॕलो! हॕलो! माईक टेस्टींग! हॕलो! हॕलो! हॕलोओओओ!” आसा बिनकामना वाजा वाजत बठतस कवधूर!


तसां दखाले गयं ते त्या लाऊडस्पीकरनं टेक्नीक कोनल्हेज कयत बियत नई, पन टेजवर गयात का एक एक कवीनी गम्मतच दखो! तथा त्या लाऊडस्पीकरवालाले बागीसकरी ईशारा करीसनी नै ते हाका मारीसन म्हन्थीन, “ए भाई! जरा ईको बढानातो! हां! हां! हां और थोडा, और थोडा! हां अब बिलकुल ठीक है!ओक्के थँक्यू”


मी झपझप पाय काकीसन स्टेजना रस्ताले लागनू, तवशीन माले रमेशदादानी हाकामारीसनी पान टपरीवर बलाई ल्हीनं. रमेसदादा मज्याना सिगरेटना धुक्कय नाकेवाटे काई तोंडेवाटे सोडत सोडत तठे कवीसम्मेलनले येयेल भावड्यासना संगे मस्त गप्पा मारी र्हायन्थात. आजूबाजूले आखो दोन चार सांगकाम्या कार्यकर्ताबी हुबा व्हतात तठे आंगेपांगेच. त्यासनाबी तोंडेसम्हा काहीना काही व्हतंज! जधय त्यास्ना जोडे गवू ते रमेशदादाच मव्हरे हुईसनी बोलनात, “आप्पा! काय ल्हेतंस? पान, बीडी, सिगरेट, घुटका, ईमल, स्वाद काई तम्बाखू बिंभाखू?”रमेशदादानत्येसनी ज्या ज्या वस्तुका सांग्यात त्याम्हातलं माले काहीज चालत नै हाई त्या पानटपरीवालाले पक्क म्हाईत व्हतं म्हनीसनी त्येन्ही माले एक लोंग आन एक ईलायची दीधी. तो पानटपरीवाला तेन्हासाठे माफाईन पैसा बियसा काई ल्हेत नई. मी ती ईलायची आन लोंग तोंडम्हा घालीसनी त्या दोस्तारेस्ना गप्पासम्हा गुतनू. रमेशदादा बोलनात कार्यकरमले आझू बराच येळ शेना आप्पा काय करश्यात तठे जाईसनी?ज्या परमुख आतिथी शेतंस ना त्याम्हातलं कोन्हीज येयेल नै शे आवलगून! याव्हर दुसरानी कमेंट आयकाले वनी, “कसकाय ईथीन हो! कसकाय ईथीन? बैझू रस्ता दखाका कश्या शे ते? साधं गाडंबैल ते सोडा पन पाये पाये येनंसुद्दा मुसकील शे! आन आशी जागे कोठे कार्यकरम ठेवतस का?”
तवासाम्हा हारपाठे हार तीन चार कारा मिरा काई पाच सव मोटारसायकली दखावताच आम्ही बठ्ठानबठ्ठा तथा स्टेजकडे निंघनूत.

यान्हा पुढना भाग सकाय वाचाले भेटीन. तवशीर जरा धीर धरा बरका!

तुम्हनाच!
शिवाजीआप्पा साळुंके,
पत्ता वर देयेलज शे!
तो नेम्मन ध्यानम्हा ठेवज्यात

अहिरानी मायना जागर भाग २

भावड्यासहोन कालदिन तुमीन आहिरानी मायना जागर हावू मी खेसरगम्मतवर लिखेल भाग पैह्यला वाची काढा. आज हावू त्यान्हा मव्हरेना दुसरा भाग सादर करी र्हायनू.


ह्या दोन्ही भाग वाचीसनी या फार्सिकल आर्टीकलवर आपला मते नेम्मन मांडज्यात हौ! कारन माले पुढे चालीसन ह्याच ईषयवर पीएचडी कर्नी शे. चला ते मंगन आते वाची काढा लवकरी. आन जेले कोनले या लेखनं आभिवाचन कर्न व्हई, नाटक, सिनेमा नै ते एखांदी सिरियल बनाडनी व्हई ते तेसले मन्ही पुरी छुट शे. फक्त मन्ह नाव मातंर तव्हढं कायम ठिवज्यात हौ. ते नका बदलज्यात. आजकाल लेख, कथा, कईता ते सोडा पन मोठमोठा प्रबंधबी चोरानी नैन फॕशनच मार्केटम्हा ई जाएल शे.जरका यान्हा ईरोदम्हा फिर्याद दाखल कैबी तरी सुप्रीम कोर्टलगून जाईसनी बी काईज हाते लागत नै! बठ्ठा खालथून वरलगून भ्रष्टाचारच भ्रष्टाचार भरेल शे! आते या भ्रष्टाचारवर बोला-लिखासाठे मन्हाजोडे येळ बीळ नै शे!)

मी, रमेसदादा, भालचंद डेकाटे, कवी भायदास, बाम्हन्हाना गौरव कोळसे, पयासराना पांडुरंग जीभकाटे, उकई धरनना सदाभाऊ वाघमारे, प्रेमचंद कुत्तरमारे, ती फेमस डँसर वैशाली डुकरे, शीतल हरने आसा आठ दाहा काही शाखाहारी काही मांसाहारी कवी, लेखक, गझलकारेस्नं टोयकन टोयकं निंघनूत घाई गडबडम्हा तथा स्टेजकडे.
कार्यकरमले आते लगेजच सुर्वात व्हनार शे! नियोजित पाव्हनास्नं आगमन व्हई जायेल शे, आथा तथा, ईबाक तिबाक ज्या कोन्ही दर्दी रसिक श्रोता व्हतीन त्येसनी आथा स्टेजकडे ईसनी आपली जागा समाई ल्ह्या होS! चला या लवकर. पाच मिनिटम्हा कार्यकरम सुरु व्हई र्हायना! आसा तो हिरामन गोंधळे एकसाय आरोया मारत निस्ता गोंधय घालत सुटना स्पीकरवर तरीपन लोके आयकेल नै आयकेलनागत आथा तथा टाईम पास करी र्हायन्थात. सतरंजीस्वर गावम्हातला टुक्कार पोर्हे काई त्या कुतल्ला नारान्याराच कार्यकरम करी र्हायन्थात.
तवशीन गावना सरपंच नानासायेब आगलावे आन उपसरपंच हरिभाऊ पायतोडे काई ती अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हाध्यक्षा सरलाताई जिवतोडे आसा गावना मानवाईक पाचसव पुढारी समोरन्या खूर्चीस्वर जाई बठनात. कार्यकरमना आयोजकेसनी त्येसनं नेम्मन आगत-स्वागत कये. त्येसले बिसलेरीनं थंडगार पानी पाजं. आते कार्यकरमले पब्लिक कशी गोया करानी हावू ईच्यारबी आयोजकेसनी निचितवार करेलच व्हता. आदिवासी नृत्यपथक, लेझिम पथक, गरबा पथक, डिस्कोदांडिया पथक, महिला भजन मंडय, प्रायमरी श्यायनी स्वागतगीतनी चमू आसा जवयपास शंभरेक लोके या नै ते त्या पथकम्हा सामील व्हतात. कार्यकरमना आध्यक्ष काही त्या परमुख आतिथी स्टेजना मांघे त्येसना एक दोस्तारना घरम्हा शी-शूफाईन ते तोंडेमिंडे धोईसनी चहा-कॉफी काई दूध, हरळा-मिरळा ल्हीसन सोफावर रेडी व्हईसन बठेल व्हतात. तवसाम्हा गावभर मिरवनूक काढानी शे म्हनीसनी माऊलीनी मूर्ति काई दोनचार पोथ्या ठेयेल, सजाडेल सुजाडेल पालखीबी तयार व्हईसनी ई भिडनी तठे. वाजावालासना गाजावाजा सुरु व्हताच परमुख आध्यक्ष काई आतिथीसनी पालखी खांदावर धरताच समदा नाच गानासना पथकेस्ना नारनारा खेय सुरु व्हयनात. आपला गावम्हा नेमका कोनता कार्यकरम शे यान्ही बिलकुल मालुमात नसेल धयड्ला धुयड्ला लोकेबी आपापल्या काठ्यामिठ्या टेकत टुकत बागे बागे चालाले लागनात. धाकल्ला धुकल्ला पोर्हेसोरेस्फाईन ते आयाबैनिसना डोकास्वर फेटा भांदेल व्हतात त्याबी त्या फेटाभांदनारले परत नै करना लागाव व्हतात, आशी कंडीशन व्हती म्हनीसन बठ्ठानबठ्ठा ती मिरवनूकम्हा मिराई ल्हेवाले काहीच कमी नै पडू दी र्हायन्थात. तसं हाई बेलदारवाडी गाव काई मोठबीठं नई व्हतं. गावले लागीसनी गावना बाया मानशेसन्या हागनथड्या जर वलांड्यात ते दोन्हीआंगे निस्त सुनसुनाट व्हतं पन आज त्या गावनी सोभा काही न्यारीच दखाई र्हायन्थी. हरेकना रारशे सडामिडा घासन रंगेरंगन्या रांगोया टाकेल दखाई दी र्हायन्थ्यात. विडियोग्राफर, फोटोग्राफर आथातथा जोडेमिडेथीन काही दुरथीन शूट करेत, फोटो काढेत, ते काहीज आडचीन नै येत व्हती पन दूर दूरथीन शुटींग ल्हेतांन्ना बिचारास्नी भलती आडचीन व्हई जाये. कोन्हा पाय गाराना ते कोन्हा शेनना ते कोन्हा कोन्हा नेम्मन हागेलमुतेलवरच पाय पडी जायेत! त्याम्हातला एक ईस्माईल शेखले मातर भलता राग वना, आन रागेरागे तो त्या फोटोग्राफरले बोलना, “सली! ये कोई ऐसे कार्ययकरम ल्हेनेकी जगो है क्या हो? साला मैं ये विडियो कॕमेरा लेकर नीचे किचड में यदि गीर जाता तो क्या भाव पडती मेरेकू! बोलो?”तो आसा वैतागम्हा बोलिज र्हायन्ता तवशीन एक धल्ला नेमका तीच गटरम्हा पडना. तेले आजूबाजूले हूबा र्हायेल लोकेसनी ऊचलिसनी कसाबसा बाजूले एकठायके बठाले सांगं. “बाबा! आते दोन वाजता गावजेवन शे तधयच ईज्यात, तधलगून बठा आते आठेच निचितवार!” तो धड्लाबाप्पा कोनले आतकस का! पडता फयनी आद्न्या ल्हिसनी बागेबागे काठी टेकत टेकत तो गर्दीम्हा कथा गायब व्हई गया काय जान.
आयोजकेस्नं आयोजन मातर भू मस्त व्हतं याले मातर माननंच पडी. जागोजागे पानीना ज्यार काई खारा मिठा नास्तापानीनी नेम्मन यवस्था करेल आसल्यामुये आसपासना गायेस्ना लोकेसनीबी भू भारी सोय व्हयनी. आसी सोय करेल व्हती म्हनीसन गावना बठ्ठा लोके आपापला घरेस्ले कुलपे लाईसनी ती मिरवनूकम्हा नाची कुदी र्हायन्थात, हाजामज्या करी र्हायन्थात कारनकी आज त्येसले चुल्हा चेटाडानी गरजच नई व्हती. चुल्हासले आवतनच देयेल व्हतं. बेलदारवाडीम्हा आसा काही गाजवाजा वाजत र्हायना आन गावजेवन र्हायनं का आसपासना गायेसना लोकेसनीबी चंगयच र्हायेना मंगन तठे! ढोरे डखरेस्लेबी चराचुराले जंगलम्हा जानं नै पडे.
हाई मिरवनूक मारुतीना मंदिरफाईन गावना गल्लीगुल्लीसम्हालागसी परत कार्यकरमना जागे येत लगून दुफारना बारा साडेबारा वाजी ग्यात, तरी बठ्ठा नाचगानारेसना हुरुप कमी व्हता व्हये नै.
हाई मिरवनूकम्हाना ज्या मानवाईक पाव्हना व्हतात त्यासम्हाई आर्धा पाव्हना ज्या आपापला वाहनेस्वर येयेल व्हतात त्यासना सत्कार मित्कार ना कार्यकरम व्हताच तेस्नी आयोजकेस्ना निरप ल्हीसनी तठीन काढता पाय ल्हिना. सकाय नव वाजाफाईन येयेल त्या लोके कधलगून थांबथीन आन वाट दखतीन? सरपंच, उपसरपंच यासनी राजकारनवरच भाषने दिधात. ती अंधश्रद्धा निर्मूलनवाली सरलाताई जिवतोडेनी जीव तोडी तोडी लोकेसले फुकफाक, जादूटोना येन्हावर आर्धातास प्रबोधन कयं. ह्या बठ्ठा कार्यकरम आटपता आटपायेत नैत. तथा जेवाखावाना टाईम व्हई जायेल व्हता. पंगतीस्वर पंगती उठी र्हायन्थ्यात. कोनाच पायपोस कोन्हाच पायम्हा र्हायेल नै व्हता. सुत्रसंचालक हिरामन गोंधळेनी सुत्रसंचालन करत आसताना त्येन्ह्या सोतान्याच पंधरा वीस कविता आयकाडी आयकाडीसन स्टेजवर काई स्टेजखाले बठेल लोकेसना काने निस्ता किटाई किटाई टाकात. काही कविसनी त्येसन्या नवाजेल कईताच मारे रेहेड लाई लाईसनी सादर करिसनी सोतानीच हाऊस भागाडी ल्हीनी. नानासाहेब आगलावेनी मन्ही माय अहिरानी! हाई लोकेसनी तोंडेपाठ व्हयेल कईता लोकेसनीच आयकाडाले सांगताच नानासहेबले जो हुरुप दाटायना का नै ते काही ईच्यारुच नका! सलं! माले एक नै समजनं का हावू जागर नेमका व्हता कसाना? कसाना व्हता हावू जागर? तवसाम्हान ह्या कार्यकरमनं आभारप्रदर्शन करासाठे मन्हा नावना पुकारा व्हयना तधय मी नेकटाच जेवाले बठेल व्हतू. लाऊडस्पिकरवर मन्हा नावना पुकारा व्हताच मी भरेल ताटवरथीन उष्टा हात कसाबसा धोईसनी स्टेजवर जाईसनी माईकना ताबा ल्हिना. वर स्टेजवर पाच सव कवी आन खाले आयकन्हारा दोनचार वायबार पोर्हे काई नेकटाच जेवन बिवन करीसनी तट्ट फुगी फागी येयेल एक दोन कार्यकर्ता तव्हढा दखावनात. तव्हय मन्हा मनम्हा मी ईच्यार कया का संलं आते आभार मानवो ते कोन्हा मानवो? त्या सुत्रसंचालक गोंधळेनी मन्हाच डोकाम्हा निस्ता गोंधय घाली दीधा. मन्ह ध्यान तथा टेबलवर जाताच तठे टेबलवर ठेयेल कार्यकरम पत्रिका माले दखायनी. ती उचलीसनी त्याम्हातला एक एक नाये वाचत वाचत काई मन्ह्या काई दोस्तारेस्न्या गाजेल नवाजेल आश्या चारोया बिरोया म्हझार म्हझार गुताडंत गाताडंत कसंबसं आभारप्रदर्शननी जवाबदारीम्हाईन सुटका करेलना आननम्हा स्टेजखाले उतरनू नै तवसाम्हाज हिरामन गोंधळेसर मन्हाजोडे ईसनी मन्हा कानम्हा बाग्गेस्करी बोलना, “आप्पासाहेब! मी मांघना चार तासफाईन ह्या बहारदार कार्यकरमनं सुत्रसंचलान करी र्हायंन्थू पन तुमीन मन्हा नावाना आजिबात उल्लेखच नै कया! काबर कयं तुमीन आस?”* त्याव्हर त्या गोंधळेले मी बोलनू,”आहो! गोंधळेबापूसायेब हाई तुम्हनी गोंधय घालानी सवय मरतलगून जाव्हावज नै का! आहो! मी जे बोलनू ते तुमीन नेम्मन आयकच नै! मी बोलनू का आम्हले आन आयोजकेसले प्रत्यक्ष आथवा आप्रत्यक्षरित्या मदत करन्हारास्नाबी मी संस्थानावतिखाल मनथीन आभार व्यक्त करस आसा बोलनू का नै हाई आठे कोन्लेबी ईच्यारी ल्ह्या!”* आसं बोलीसन मी मन्हा ताटकडे जावाले लागनू ते तठे मन्हाजागावर भालचंद डेकाटे बठेल दखावनात. आचारीना आंदाज बेलदारवाडीवालासनी आन आसपासना गावना लोकेसनी पार फेल पाडी टाकेल व्हता. खीर पुरनपोया, रसई-भात, पापडे कुडलाया याम्हातलं काही म्हन्ता काहीच शिल्लक र्हायेल नै व्हतं. भूकना मारे मन्हापोटम्हा कावया काव काव करी र्हायन्थात पन आते सांगवो ते सांगो कोनले?


ते भावड्यासहोन हावू अहिरानी मायना जागर तुम्हले कसा काय वाटना ते माले कमेंट करी लिखी धाडज्यात. माले याव्हर पीएचडी करानी शे हाई मी तुम्हले यान्हा पह्यलेच सांगेल शे! भेटूत आते आखो एखांदा जागर बिगरना कार्करमम्हा! चला ठेवस आते! तवलगून ढ्यांगटड्यांग!

तुम्हनाच!

शिवाजीआप्पा साळुंके
,

तिरुपतिभवन, झेंडाचौक, महाल, नागपूर.

1 thought on “अहिरानी माय मावलीना जागर खेसरगम्मतवरन्हा लेख”

Comments are closed.