अहिराणी रचना वास्तव

अहिराणी रचना वास्तव

वास्तव

रम ओडका,बीयर, व्हीस्कीनी किक काही बसत नही
नंबर वन , मॅकडोनाल्ड खिसाले भार सोसत नही॥
अस्सल जंगली मोह न फूल । गावमा कुठे दखात नही ॥


नदी पल्याड हाथभट्टीनी ।  स्टेटस ले मना शोभत नही॥
उभा जलम गया पेवामा । गावठी शिवाय भागनं नही ।
खंबा इलायती चकना पुढे देशीनी सर येत नही॥


गाव गाडाना जुना सोयरा । कुठे बैठकमा दखात नही ।
गावरान कोंबडी सुकट झिंगा ।   वास बोंबीलना राहीना नही॥

जावळं जलम ना आणि कंदुरी । थाटीले सरतन दखात नही।
मडकं गाडगं फुटेल बाडगं चुलाना धूर निघत नही॥

हळद लगन नी सात दिवस नी । पिवळा नवरदेव दखात नही।
रुसणं फुगणं वर मायनं । लगण मा गोंधळ राहीना नही॥

गाव गाडा ना पाटील तात्या । सिटी मा बायजा दखात नही।
यात्रा जत्रा आणि बोहाडा । आते बजारले तमाशा येत नही॥

साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक मो 7507148676