अहिराणी गोट आठुयी
नानाभाऊ माळी….
आठुयी कसा सबद से दखा नां!काटाई बोरन्ह झाडलें निय्यागार गोलगीटिंग बोरें दिखतस!काटाई फांटीलें बोरेस्ना झूमका लंबकत दिखतस!काही दिनथुन निय्या बोरे पिकी,लाल व्हयी जातंस!लाल बोरे जाता येतानी नजरलें चगाडतं ऱ्हातसं!डोयालें दिखनातं कां भस्कर्शी तोंडंलें पानी सुटी मानोस बोरना झाडनां आंगें चालना जास!काटायी फांटीनां वाकडा काटा हात पायलें झूलूझूलू करतंस!तरी भी काटा टाईटूई आपला हात पिकेल पिव्या-लाल बोरेस्पावूतं भिडी जातंस!बोरें तुटनात तें ठीक,नई तें मंग एखादी काठीवरी बोरलें झोडी काढो!नई तें मंग जोरजोरम्हा फांटी हालायी बोरें बदबद खाले पाडानं!येची-टुची,गोया करी,खिसा भरी,एक एक तोंडंम्हा टाकी चघयी-चुघयेतं ऱ्हावो!आठुयी पचकन तोंडम्हायीनं थुकी देवो!आठुयी कथी भी पडो मंग!तथ दखो नई!आठोयी हरभरा आनी शेंगदाना इतली मोठी ऱ्हास!कडकठोन ऱ्हास!
बोरनं झाड दुसरानं!खानांरा दुसराचं!बोर चघयी-चुघयी खाणारा दुसराचं!आठुयी दूर पाऊत थुकी का व्हयनं!बोरनी आठुयी घरमा पोरनं रूप ली कव्हय घुसनीं यान्हा काय इतिहास सांगता येत नई!घरमा धल्ला-धल्ली धाकल्ल्या पोरीसलें म्हंतंस,”वं!आठूयीस्वन आथ्या-तथ्या हाद्या-कुद्या मारी ऱ्हायन्यात!जिवले निरानाम आराम नई!निस्त भंगाडी सोडं या आठूयीस्नी!बोमा मारालें भंग नई इस्ना!रात दिन निस्त्या वसरीम्हाचं गरबडतीस!पाय दये येतीस!”
‘आठुयी’ हावू सबद नेम्मन पोरीसलेंज का बरं चिटकाया व्हयी?पोर बेट्या का चघयी-चुघयी फेकान्या ऱ्हातीस का?अहिरानीम्हा हावू सबद नेम्मन कसा
घुस्ना व्हई बरं?बोरनीं आठुयी रामायण काय फाईन से!श्रीराम -सीतामाय वनवासम्हा वने वन भवडी ऱ्हायंतातं!खान्देशम्हा भी भवडी
ऱ्हायंतात!फय खायी-खुयी जंगलम्हाचं ऱ्हायेतं!तठे जंगलम्हा आपलं झोपडं सवारी-सुवारी शबरी नावनीं एकनिष्ठ श्रीराम भक्त ऱ्हायें!शबरी माय आंबट बोरें दातवरी करतडी दूर फेकी दे!गोड गोड बोरे संघयी ठेये!गोड बोरे चघयी श्रीराम गुंता गोया करतं ऱ्हायें!एक दिन उगना आनी श्रीराम दर्सन शबरी मायलें व्हयन!श्रीराम बोलनात,”बोरे कितला गोड सेतस शबरी माय!मन गरायी गे!
बोरे त्याचं सेतस!लाल-पिव्या सेतस!गोड गोड सेतंस!आठुयी तिचं से!कडकठोन से!पोरी तें कव्या,कोमल, एकदम धाकल्ल्या ऱ्हातीसं!हायी कडकठोन ‘आठुयी’ धाकल्ल्या पोरीस्ना पानउतारा तें नई करी
ऱ्हायनी नां? बोर गोड ऱ्हास!कव्हयं आंबट ऱ्हास!तोंडं वाकडं व्हयी जास इतलं आंबट भी ऱ्हास!पन आठुयी कडकठोन ऱ्हायनी तरी तिले फोडी मधम्हा जो गिद्दू नींघसं त्यांनी चव तरी कोनी दखी का?घरमा कितल्याग आठोया ऱ्हातीस!मधमा पाक,निर्मय, पवतीर ऱ्हातीस!वर अठोयी कडक दिखत ऱ्हास!आठोयी फोडी मधमा दखं तें बदामनांगतं धाकल्ल्या दोन बिया ऱ्हातीस!चव भी बदामन्हा गत ऱ्हास!मधमा आठोयी न्यामिनी ऱ्हास!पोरी आठोयी ऱ्हातीस!कोनी आठोया म्हतंसं!कोल्ल नारायण गोड खोबरं ऱ्हातीस अशी ती आठोयी बोरन्ही ऱ्हास!पोरी काय नीं बोरी काय,
मधम्हायीनं जीव लावणाऱ्या आठोया ऱ्हातीसं!
नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे.)
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२० डिसेंबर २०२३
