अवकाळी पाऊस . . . अहिराणीतला लेख ” देवबा तोंड ना घास काढा रे बा ss ! “
” देवबा ‘ तोंडना ” घास ” काढा रे बा ss ” ” माय माय माय . . . देवबा काय या दिन दखाले लावात रे देवबा ss ? ” तवसामा देवराम बोलनाच ” काय करस न्हान माय . . ? त्यांना म्हवरे कोनं काई चालस का बरं ! नई तूच सांग . . ? ” “दोन दिन पाहीन त्यानी हाई घोंगड् घाली ठेव व्हतं . तो काया कुट ते काया कूट शेतकरीसनं तोंड बी कायं व्हवानी पायी येल शे . तरी तो मरी माय खाव त्या शेंपाले दोन दिन पाहीन सांगी राह्युंतु . बाया लाईसन गहू वरपी टाक म्हंत . पन त्या कायतोंड्या नी बी ऐकं नई ” शेंपा बोलना ” बरं झाये न्हान माय त्या बल्ला ना हेटला दोन तुकडासना गहू मी गाडा म्हा भरीसन खय्या ना झोपडाम्हान ताडपतरी म्हान झाकी उनू ” . “बरं कये बा ss ! ” या गारपीट नी वावरेसम्हझार आख्खा पीके आडा पाडी गयात. कोना केयीसना बागा खल्ले लागी ग्यात . कोना दरक्षासेना मनी काढानी ये व्हती .आख्खा दराक्षे जमीन दोस्त व्हई ग्यात . मक्की पुरा खल्ली लागी ग्यात. हाते तोंडे येल घास देवबानी हिसकायी लिना ना हो . दखा ना हो . हाई कर्ज कथाईन फेडाई हाई चिंता त्या शेतकरीसले सताडी राहयंती . त्यासना घरमा सूतकी वातावरन व्हतं . ज्या पीक पानी ना भरोसाम्हा रात दखी नई ना पहाट दखी नई वारा वावदन दखं नई . या पीकेसले आपला पोटना पोरेसना मायेक वागं लावं पन . . पन या अवकाई पाऊस नी झोपाडी दिनं हो झोपाडी दिनं ‘ मायन्यान कदी भो .थोडा दिनम्हान मार्केट म्हान लई जानार व्हतात हो. पैसा ईथीन कर्जाना हप्ता बी लावाई जाता . हाई आशा व्हती .पोर बी छाती आव्हढी झायी त्या चिंतामा त्याले जप बी लागत नई व्हती ना हो त्याले . आनी . . . आनी या अवकाई पाऊस नी उप्पाडी घालं हो. . मायन्यान कदी भो . . उप्पाडी घालं . बठ्ठा शेतकरी हवाल दिल व्हई ग्यात . काय करथीन हो या निसर्गा ना मव्हरे ? बठ्ठासना चेहरा उतरी गयथात . खेत मझार जावानी इच्छा बी कोनी व्हत नई व्हती ना हो . काई काईसना हुंदूक दाटी ये आवाज बी फुटी नई राहयंता . काय करतीन ? त्या वावरम्हान गुडघा लोंग पानी ज्या पीकेसलं लेकरूना मायेक वाढे लावं व्हतं त्या आडा पडेल दखा ले वावरम्हान जातीन का ? नई तुमीनच सांगा पटस का तुम्हना मनले ? नईना . . . कसं बोलनात बरं . ! भयान . . भयान . . आहो ती नान्ह माय ते न्हान माय पन सोजा बोय ते दगडी हेर जोडे तोंड ठोकीसन रडी राहयंती . अहो गंमत ते गंमत तुम्हले सांगो मंडई अहो गोठा म्हातल्या गायी म्हशी ईज पडीसन मरी ग्यात हो . बोला आते . दुध दुभता जनावरे भर पडता पानी म्हान सापडी ग्यात . आंगेस वर ईज पडीसन ठायकेज कंडली ग्यात . . . भलतं भलतं नुकसान झाये हो ‘ भलतं नुकसान झाये . न्हानमाय ‘ घडी घडी तोंड ठोके . . . म्हने . . ” मरी जायजो तो पानी . . . आनी रडाले लागी जाये . कव्हढ नुकसान शे हाई . साध् नुकसान शे का हाई ? सरकार नी पंचनामा कराले जोयजे . वावरेसना दौरा कराले जोयजे . अर्धा मरेल शेतकरीले धीर देवाले जोयजे पंचनामा करीसन शेतकरीले भरपाई देवाले जोयजे . काय म्हननं शे तुमनं ? याम्हाईन शेतकरी उभा राही असं वाटस का तुम्हले ? शेतकरी ले मदत भेटी ते जगी तो नई ते पार संपी जाई हो तो संपी जाई . . ! त्याले उभारी द्या . आखो धीर दिसन उभं करा त्याले . शेतकरी सुखी तर आपुन बी सुखी राहसुत . नई का मंडई . . ! बरं मंग येस .
विश्राम बिरारी ‘ धुळे 9552074343 . . .