गोडी गुलाबीना दिन

गोडी गुलाबीना दिन

॥श्री॥
॥गोडी गुलाबीना दिन॥

गोडी गुलाबांना दिन ग्यात कथा उडिसनं
नव साल उनं देखा उनं पंख लाईसनं
दिन सोनाना व्हतात आते लउत परत
नका बसू बरं आते काही हिशोब करत…

जे वाही गये भलबुरं नको याद त्यांनी
पाय ठेवा भुईवर आनि डोकं ठेवा ध्यानी
करा इचार चांगला भलं करा कोनं तरी
कष्टाले हटू नका मनी राही तरतरी…

कष्टाले येस फय नही मरत हो कोनी
लाथ मारानी हिंमत आनि काढा तठे पानी
जसा इचार करो ना तसं तसं व्हसं बरं
करा चांगला इचार बठ्ठ हुईजाई खरं…

चला वावरे पिकाडा खतपानी घाला त्याले
हाई कॅांक्रिटनं जंगल नही देवाव खावाले
भुईमाय ले पुजा हो करा तिनी निगरानी
हिरवाईना व्हा धनी तिले करी टाका धानी…

लागे खावाले भाकर गंज महामूर देस
देखा बांधबांधवर टंच दानानं कनिस
मायमाटीले इचारा मनोभावे करा सेवा
खेतवावरम्हा देखा कशी निर्मय ती हवा…

नववरीस आपलं आपनंच त्याले घडू
प्रेम बंधुभाव दया यासले खेतम्हा पिकाडू…
करा ठराव मनम्हा काय काय करनं से
देव सदा सोबतीले काम आपुनले करनं से…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
दि: ३१ डिसेंबर २०२४
वेळ : रात्री ९/४४

img 20250101 wa00061957474676847089494

येता वरीस मागू मी काय

नवीन वरीस येता मागू मी काय?
पंढरीना राजा विठ्ठल धाव
शेतकरी आस पोता पोता भरत
उखलेल पैका अडका मी फेडत

गरीब पोटले दोन तुकडा
वर छप्पर  अंगभर कपडा
नको आश्रम वाट दखाडत
माय बाप राऊळी मंदीरात

सगळा मनमा जिव्हाळा
माय बाप फळ ऐकोळा
धनदौलत देखत
खूप काही आम्ही कमावत

मागला वरीस सुख वेचत
साहित्य वारी मी करत
पांडूरंग हरी श्रीकृष्ण मुरारी
भेटीगाठी पदर बांधत

येता साल पंच आरती ओवाळत
गरीब दुबळ्या कष्टकरत खात
हाई वरीस सुकण आशा ठेवस
खान्देश कन्या मनत मागस


सविता पाटील

img 20250101 wa00073117653173933503068