अहिरानी बोली भाषेतील मकर संक्रांत कविता
🪁याद सक्रात लयनी🪁
माय माय करु माय
गोडी तियनी गुयनी
लाडू तियना गुयना
याद सक्रात लयनी॥धृ॥
गोडी काय सांगू त्याम्हा
ममतानी मिसयनी
माय साठी कविता बी
मन्हा मनम्हा जुयनी॥१॥
माय माय करु माय
माय ममता तियनी
गोडी तिन्हा मनम्हा व
पुरी भरनी गुयनी॥२॥
तिन्हा सारखीच माले
देखा कविता मियनी
एक एक सबदम्हा
गोडी भरनी गुयनी॥३॥
सांगू मायनी ममता
जशी तियनी गुयनी
तिन्हा बिगर व मया
बाप नी ना पघयनी॥४॥
याद यस व मायनी
जरी नही ती र्हायनी
उनी उतरान संगे
तिन्ही याद बी लयनी॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३

कविता अहिरानी बोली भाषेतील
गानं सुखनं शांतीनं
सन मांगे सन उना
सन उना उतरानं
संगे लयी येस हिवं
यानं येनं हिवायान॥धृ॥
गोडी भरनी यानाम्हा
जशी तियं गुयम्हान
येस जसा का सांगाले
गोडी गोड बोलाम्हान॥१॥
जसं तियनं गुयनं
गोड आम्हनं बोलनं
तरी दुनियाले कसं
नही गोड ते लागनं॥२॥
आरे चीन पाकिस्तान
ऐक आम्हनं बी गानं
दुनियाम्हा राहो सदा
सुख शांती समाधानं॥३॥
तिय गुयना गोडीनं
गानं सुखनं शांतीनं
जोडी ल्ह्यारे जीवनले
तेबी चालनं गतीनं॥४॥
देखं गोडी गुलाबीनं
आरे आम्हनं जीवन
एक तियं बी खासूत
आम्ही बठ्ठा वाटीसन॥५॥
निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, प्लाॅटनं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जयगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
शब्दार्थ :- उनी=आली, उनं=आलं, उतरानं =संक्रांत, तियनं गुयनं=तिळाचं गुळाचं, आम्हनं =आमचं, जोडी ल्ह्यारे =जोडून घ्यारे, जीवनले=जीवनाला, तेबी=ते
सुध्दा, गतीनं= गतीने, गोडी गुलाबीनं =गुण्यागोविंदाचं, खासूत=खाणार, वाटीसन=वाटून- न भांडता हिस्से करुन.
