Khandeshi Ahirani poetry
गह्यरां फिरी फिरी येस
🌨️💦🌨️💦🌨️💦
**********************
… नानाभाऊ माळी
आरे पाऊस पाऊस
हेंगडा वाकडा तू येस
धव्या भुरा कायाढूस
हुभ्या फुगड्या रें खेस!🌨️
गह्यरां फिरी फिरी येस
आते करू नको चाया
रोहिणी चालनी रें वाया
मिरीग पडी ऱ्हायना पाया!🌨️
चिखूल पानीन्हा लोंढा
इघरें ढेकाया लाल काया
डाबरां कुखां भरेलं खोया
निर्दयी लावू नको माया!🌨️
वल्ला दुस्काया पाऊस
…. खेती गरीबनी गाय
नही सख्खी तिले माय
काठी उगारीसनी वायं!🌨️
आरे पाऊस पाऊस
जग पाडी ऱ्हायनं नाया
पाम्हेर नयचाडान्यां नया
भरीं बिवारान्ह्या खोया!🌨️
🌨️💦🌨️💦🌨️💦
********************
… नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२८ मे २०२५
