जीव मन्हा बयस
जीव मन्हा भल्था बयस,
खान्देसनी दशा दखी,
व्हयी रहायनं वैरान,वैरान,
जथातथा इकास गया रुखी.१
नयी आठे कोनले सोयरसुतक,
चांगला रस्ता दखाडनारेस्ले,
नयी आयकतस कोन्ह कोन्ही,
मान देवाले धजत नयी तेस्ले२
यखादा चुकी माकी उना,
धज उचलाले दैना तेनी,
कसाले खास घरन्या भाकरी,
तुल्हे काय इतली पडनी?३
तव्हयते जीव मन्हा ,
जास्ती कोल्ला व्हस,
जीवान जीवान पोरे,
मुरगजयना मांघे पयतस ४
निवडी येवा पुरता पोखथस,
नंतर मी कोन तू कोन,
तव्हलोंग याद ठेवथस,
नंतर इसरी त्या जाथस ५
मोबाईलनी तर्हा न्यारी,
लागी जायेल उपादी,
कालदिन पानीबी पेवाले,
भेटाऊ नयी व्हयी बरबादी.६
इनंती बठ्ठासले करस,
आतना कायजथून येथा,
तुम्हीबी समजी ल्या भाऊस्वोन,
नयी ते तुम्ही तथा,मी आथा.७
पानी,झाड,ध्यास पर्यावरन,
तुम्ही सग्गय समायी ठेवा,
घर ,सौसार,नवकरी,खेती,
धंदावर बी ध्यान देवा.८
जूना दिन परत येथीन,
खान्देस सोनाना चमकीन,
आथा तथा गोंगल्या तोडानी,
वटाना काट सव्वा हात व्हयीन.९
चिंतनशील
मझिसु प्रा.मगन सुर्यवंशी
