कापसा असी कसी रे तुनी वाईट अवस्था
खान्देशी अहिराणी कविता वाईट अवस्था…
कापसा असी कसी रे
तुनी वाईट अवस्था…
खाजी खाजी कई
आम्हनी हाई दुरावस्था…!!
दोन पैसा भाव वाढी
आशाथीन घरमा तुले ठेव…
खाजत सुटना आम्हले
झाया आंगले मजबूत घाव…!!
घरमा धाकला मोठा
समंधासले तंग करी सोड…
येड्यागत खाजी खाजी आंगले
पार कमरडच मोड…!!
खाजराले कंटाईसन
कोनीच घरमा घुसेना…
डोपरे कोपरे खाजत
डोयासले वल्ला अश्रु थांबेना …!!
दिसाले धव्या बरफ
मखमली सारखा गेंध…
खाजरा ले देखीसन म्हणस
दुर सरकीसन बसा रे बेदुंध…!!
भाव पडनात मार्केटले
व्यापारी येतस नही दारले…
कटाईसन देवान म्हनो
भाव काय मिळेना कपासीला…!!
Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
दिनांक =०२-०२-२०२४
