घर खाली करी दिवाई चालनी
घर खाली करी दिवाई चालनी
नानाभाऊ माळी
दिवाई उनी,गाय गोरसन्ही बारनासंगे!धनन्ही पेटी धन त्रयोदशीलें उनी!नरक चावदससंगे उनी!लक्षुमी पूजननां पूजा करी लिधी!पाडवानं दिन ववायी लिधं,पूजा व्हयनी!आनी भाऊबीजलें बहिनीस्नी भाऊस्लें ववायी लिधं!येर मांगे येर सव दिन दिवाईन्हा हासी खुसी निंघी ग्यात!बठ्ठ नातंगोतं गोया व्हयी येल व्हतं!घर भरी जायेल व्हतं!पैसाथून नातं मोठं व्हतं!हिरदम्हा नेम्मन बठी जायेल व्हतं!दिवाई आंगल्हे पखे बांधी उडी गयी!हिरदम्हा दिवानं उजाये दखाडी दिवाई उडी गयी!घरना खोपाम्हा येल बठ्ठा पक्षी उडी ग्यात!भरेलं घर खाली व्हयी गे!दिवाई व्हडा लायी गयी!
दिवाई उनी!घरदारले कपडा दि गयी!थाठीम्हा चांगलं-चुंगलं व्हाडी गयी!आनंनम्हा जगानं शिकाडी गयी!उसना,याजूनी काढेल पैसांगुंता वाकाडी गयी!दिवाईन्हा सोनाना दिन मातरं चांगलाचं धकाडी गयी!दिवाई धाकला मोठास्लें खेवाडी गयी!दिवाई पयेत पयेत उनी,आनंन व्हाडी गयी!लाडी गोडी लायी,गोड धोड खावाडी गयी! फटुकडा फुटी ग्यात!घरे दारे चमकी ग्यात!आंधाराले ढकली उजाये मव्हरे पयेत उनं!दिवाईलें जथा बन तथा डोया चमकी ऱ्हायंतात,कान ठनंकी ऱ्हायंतात!नाक तोंडम्हा फटुकडास्न धुक्कूल घुसी ऱ्हायंत!ते धुक्कुल नाक तोंड व्हडी ऱ्हायंत!धुक्कुलम्हा जीव गुदमरी ऱ्हायंता!पन दिवाईन्हा आनंन जग दुन्याथुन मोठा ऱ्हास!बठ्ठास्नी घरदारम्हा मज्या ऱ्हास!वरीसम्हा एक डावचं सण येतं ऱ्हास!त्यान्हा आनंनं एकदम आल्लग ऱ्हास!
गरीबथून शिरीमंत पावूत बठ्ठा सण साजरा करतस!गरीब व्हडातान करी,आथ्या तथ्या आवकाया करी,झामली झूमली,पैसा गोया करी, सण साजरा करत ऱ्हास!शिरीमंत पैसा उपसी-वापसी सण साजरा करत ऱ्हास!दोन्हीभी आपली आवक, आवकात दखी दिवाई साजरी करत ऱ्हातसं!आते ते दिवाईना फराय गावें गावेंस्मा,घरेस्मा घुसी जायेल से!न्यारा न्यारा जिन्नसा करानी हुडीवर धुडी सुरू व्हती!सहेरम्हा ऱ्हानाऱ्या माय बहीन बाया,या खेयम्हा न्यारा आनंनं ली ऱ्हायंत्यात!करंज्या,चकल्या, संकरपाया,लाडू,चिवडा करानी बठ्ठया माय-बहीनीं,व्हवू-बेटीस्ना आंगम्हा यी जायेल व्हतं!त्यास्लें दुसरं धुत्रूमं चालें नयी!कोनी टोकेलभी चालें नयी!खिजावं-कताव चालनं नयी!तोंडम्हायीन नींघेलं सबद झेली ऱ्हानां पडे!चुचकारी,पुचकारी,पाचकरी दिवाईन्हा फराय व्हयी जायेल व्हता!
‘इन घरनी चकली चांगली का तीन घरनीं करंजी चांगली?डोयास्ना खेयव्हर बठ्ठया खाना खूना व्हतं ऱ्हायन्यात!बाया हुभारीम्हा व्हत्यात!फराय बनाडानां चक्करम्हा बाकीनं बठ्ठ इसरी गयत्यात!पैसास्नी खुवारी करी,फटुकडा फोडी,धुक्कुलम्हा हुभा ऱ्हायी आनंनम्ही बुडी जावानीं मज्याचं न्यारी व्हती!मंग मांगेतून सण सरावर खोकली खोकली डाक्टरन्हा खिसा भरत ऱ्हावों!उजायान्हा सण दिवाई दनकेबाज साजरी करत ऱ्हावो! दिवाईना चमक्या -धमक्या, नव्वा कपडा घालेलं दिन दनकेबाज निंघी ग्यात!हासी खुसी,सुख दुःखनां पंधा धरी,घरभारलें दिवाई जेवाडी गयी!खावाडी गयी!मांगलं संगयेल बठ्ठ सरांयी दिधं!दूर दूर सुटी जायेल मूक्ला पंधा आखों करकचीस्नी बांधी लिधा!सहेरन्हा नोकरदार धाकला-मोठा भाऊ ब्यागा भरी सहेरम्हा निंघी ग्यात!दिवाईम्हा बठ्ठा हासी मज्याकम्हा बुडी गयतात! कलकलम्हा डुबी गयतात!
दिवाई थंडीन्ही झावर पंघरी हात झटकी निंघी चालनी!आपुन दखत ऱ्हावों!आखों सोताल्हे रवसडीस्नी कामेस्लें जुपी लेवो!थंडीन्हा गहू, हरभरा, दादरलें चाचे लायी देवो!लांघीम्हा पानी व्हात ऱ्हास!गहू,हरभरानां बारा भरत ऱ्हातसं!आपुन बारा वायेतं ऱ्हावो!’हात सोडी निंघी चालनी!’…मांगल्या यादम्हा बुडी जावो!कव्हयं हासू येस!कव्हयं लडू येस!हासता-लडता आतेच पहिरेलं गहून्ह बारं भरत ऱ्हावो!चपाटा करी,पावडी फिरायी बारं वायी देवो!वावरन्ह पोट भरत ऱ्हास!आते थंडी वाढी ऱ्हायनी!धीरे धीरे गिरजदारीम्हा दिवाईन्ही याद मांगे पडी जास!संवसारन्हा गोमडाम्हा मांगलं मांगे पडी जास!आपुन चालू काम दखी पुल्लांमांगे येडा बांग्या व्हयी पयेत ऱ्हावो!देवबा फाइन उधार लेयेलं जिंदगीलें हासी-खुसी,खिजावं-कताव करी,कव्हयं बामकाडी व्हडत ऱ्हावो!
दिवाईन्ही चमक धमक भुली डोया लायी लेवो!
नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि. धुळे
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
दिनांक-०३ नोव्हेंबर २०२४
nanabhaumali.blogspot.com