दिवाई कधय बलाई दिवाळी अहिराणी कवीता
॥श्री॥
दिवाई कधय बलाई
हाई दिवाई कधय बलाई
माले माहेरले जावानी घाई..
काम करी मी कट्टाई गवू
कवय लेवाले इ मना भाऊ
शेतकरीना भलता पसारा
कितली राबू मी वावरमां जाऊ
कवय भाऊ मना लई जाई… माले माहेरले….
बारा महिना जुपेल ऱ्हावो
कोल्ली मिरची भाकर खावो
राबो कितलं तरी पुरेना
घरवालास्नं मनं भरेना
माय महिनाभर माले लई जाई…माले माहेरले…
माले दखतांज खुलतीन तोंडे
गोया व्हतीन मना भावंडे
माय भाकर ववायी टाकी
समदा बठतीनं मंग दाटीवाटी
माय मनी सुखदु:ख चावई…माले माहेरले…
सांगा कोनले सुटना जोजार
हरएक हो ऱ्हास बेजार
भेटीगाठीस्मा हवा पालटे
नातागोतानां बजार भेटे
कष्ट इसराले जागा सव्वाई…माले माहेरले…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १/११/२०२४
वेळ: संध्या:५/०९