ahirani song lyrics सावली

Ahirani song lyrics सावली

कोन से तुन्हा संगमा
प्रश्न से मन्हा मनले
उभा एकटा रस्तामा
काय अर्थ जीवनले…!!

खे कसा रे डोंबारीना
मग्न से डाव रचामा
डाव रडीना तेसना
वार कयात पाठमा…!!

चारी बाजूले अंधार
उभ्या भयान चेटना
थोडा दिन नं आयुष्य
आज एकला व्हयना…!!

मध गोड लागताच
माख्या भुनभून करे
बोल खराना निंघता
कय लागनी वा प्यारे…!!

बोल सावलीना खरा
नही से सहारा तुले
मार्ग सत्याना धारा ते
उभा त्याच ईरोधले…!!

लाभ भेटे तोवर हा
मान तुले खरा भेटे
नही वाग मनजोग
आज त्याच मोडे बोटे…!!

खरा सोबती व्हयक
नको भावनिक होऊ
जग कपटी मोठ हां
नको थारा तेले देऊ…!!

चाल आखामा त्या पुढे
लावा लावी करी भारी
मस्त देखावा गोडीना
डाव तेसना अघोरी…!!

✍️Psi विनोद सोनवणे धुळे
            दिनांक =२६-०५-२०२५

तू कायबी कर बदलाऊ नयी दुन्या

एक व्हतं वांदर