आशी तू आशा मी

आशी तू आशा मी

आशी तू आशा मी

तू धवयीसप चांन्नी
मी ते गिर्‍हननी बांग,
मन्हा डोकाले खवडा
तुन्हा दुरलोंग भांग.

तू शेवंतीज खुलस
मी ते बाभूय काटाना,
मन्हा रूपना इच्कोबा
तुले आरसा पाटाना.

तू इनाना त्या सुर
मी बोल ढुमडाना,
मन्हा आवकाळी जीव
तुन्हा पानी मिरीगना.

तू सध शे कमयन
मी ते फिरस भिंगोटा,
मन्हा दिह आडरंखा
तुन्हा नागिन चपाटा.

तू सैसांजना वं सूर्ये
मी ते भादोड्यान उन,
मन्हा जीव जिनगानी
तुन्हा हातले बी गुन.

मी ते आशाज येडांगा
तू गोटम्हानी वं रानी,
कये तुन्ह भारी मोल
तुन्हा सवाय ना कोनी.

मी तुन्हा व जागल्या
तू ते घरनी राखन,
जलमजुगना जोडा
बये चुल्हे बयतन.

काशीकन्या
सब्देस्ना पसारा काव्यसंग्रह