Ahirani language poetry
॥श्री॥ हाई नशिब नशिब
हाई नशिब नशिब सांगा देखं का हो कोनी
सांगा नशिब देस का हातम्हा आयतं पानी
झाड हालावो तवय चिचा पडतीस खाले
मंग कसाले कोसो हो सांगा बरं नशिबले …
मनगटम्हां धम्मक आनि डोयाम्हानं पाणी
प्रयत्न तो परमेसर घरघर आबादानी
नका करू देव देव नका जाऊ तीर्थालेबी
लबाडसनां त्या धंदा बठ्ठा सेत मतलबी…
देव सांगस हो देखा तुमी कामधंदा करा
तुम्ही करतसं काम फक्त माले याद करा
सोडू नका कामधाम सोडू नका रामनाम
करा प्रपंच नेटका तेच देखा मुक्तीधाम…
चाला नेकीना तो रस्ता निंदा नालस्ती ती नको
मन गंगा नि नर्मदा कोनी कितलाबी बोलो
त्यानं पाप त्याले लागी जो चुकी जास रस्ता
कर्म करा देव भजा कितला उपाय हो सस्ता…
थोडा थोडा करो स्वार्थ थोडा करो परमार्थ
मंग जीवनले येस देखा थोडाफार अर्थ
नशिब आपला हातम्हा लाथ मारो तठे पानी
तयहातम्हा नशिब येत नही आनिबानी…
नशिब नशिब करीन त्याना पुरताच वांधा
आईतखाऊ लोकेसना कामचुकारना धंदा
घाम गायो काम करो मंग फिरस नशिब
घडे मनगट नशिब नको फुकटना लोभ…
प्रा.सौ.सुमती पवार
(९७६३६०५६४२)
दि: ४ मार्च २०२३
वेळ : रात्री १०/५१