अहिराणी अष्टाक्षरी पानकाया
अहिराणी:- अष्टाक्षरी
पानकाया
पड पड रे पाऊस
न्हाती धोती कर सर
व्हयी तव्हं आबादानी
मन्हं सुकेल वावर
करी टाकी मी पेरनी
बट्ठा तुन्हा से भरोसा
आते दुबार पेराले
नहीं खिसामान पैसा
साल सालले काबरं
हातोहात गंडाडसं
काय भेटंसं रे तुले
घयघय रडावसं
लेक व्हयनी रे मोठी
तिले उनारे पदर
तिन्हा लगनना साठे
माय पसरे पदर
नको माले ती कुडची
नको तिले बी लुगडं
पोरगं शायमा जासं
कसं धाडू रे उघडं
यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर(जि.ठाणे)
९८९२३३३६८३
तारीख:-२/७/२०२४
