Ahirani language poetry
.॥श्री॥
माय माय
माय माय माय करू
माय मयानी पांभर
कशी पयरे पयरे
पिक येस घरभर…
माय माय माय करू
माय मयानी ती मेर
बारा धरस धरस
पानी करी देस ढेर…
कांदा लोसनना बारा
टुपी टुपी तन काढे
मनी मायले दखीनं
कांदा लोसन तो वाढे..
माय मयानी बरकत
माय बांधनी ती सोभा
बठ्ठा घरदारना ती
व्हती मजबूत गाभा…
तोडे गवार नि भेंडी
आंग कुचकुच करे
हातमोड्यानी बाजरी
दोनचार त्या पांभरे…
बिजबियानं राखम्हा
नहीं लागे त्याले किडं
येता मिरिग ती काढे
वाफ येताच ते वाढे…
याद कितलीभी करो
नहीं परतावं आते
डोया समोर दिससं
कांदा सोये राते राते…
जास मानोस निंघीनं
आपुन याद करो त्याले
त्यासना उपकार देखा
उनात आपला वाटाले…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २४ मे २०२५
वेळ: दुपारी १२/४८