कर पानी पानी

कर पानी पानी

॥श्री॥

            कर पानी पानी…

पड रे पाण्या पड रे पाण्या कर आबादानी
तुनावाचूनी खेतीबाडी हुई गई रे सुनी…
औत पडनं पांभर पडनी बैल खुटाले
कधय  येशी सांग बाबा आमले भेटाले…

चारा नही पानी नही बांध भी सुना
आभायम्हा तुना सुगावा काही लागेना
ढोरे चाराले जावो कोठे हिरवाई नही
वावरम्हानी हेर भी आते खोल खोल गई…

कापूस दिसे आभायम्हा धव्याबरफ
येडा व्हयना कारे बाबा असा करस
काया काया ढग येऊ दे बिजली चमकू दे
सय सय धारा थंडा वारा पानी बरसू दे…

नको मारू रे पोटवर तू भुक्या मरथिनं
तुना लेकरे किलावना  का तुले चालथिन?…
सोड राग तू नको रूसू ना कर आबादानी
तुन्या पिपान्या वाजू दे ना कर पानी पानी…


प्रा.सौ.सुमती पवार नाशिक