अहिराणी दिनदर्शीका २०२४ Ahirani Calendar 2024
अहिराणी दिनदर्शीका
अहिराणी कॅलेंडर 2024
Ahirani Dindarshika अहिराणी दिनदर्शीका Ahirani Calendar 2024
अहिराणी दिन दर्शिका
अहिराणी दिनदर्शिका… एक स्तुत्य उपक्रम… प्राचार्य प्रशांत पाटील
भाषा संवर्धनासाठी अहिराणी दिनदर्शीका महत्वाची
बापूसाहेब हटकर,
जल(पाणी)विषयाचं महत्व आणि गरज विषद करणाऱ्या लेखांचं समृध्द भांडार म्हणजे अहिराणी दिनदर्शिका-२०२४ – प्राचार्य एन.एम.भामरे,
अहिराणी दिनदर्शीका हा माहितीचा स्रोत – अर्जून पाटील.
अत्यंत वाचनीय, संग्रहणीय जल लेखांच आगर म्हणजे अहिराणी दिनदर्शिका-२०२४ होय– विकास पाटील,
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे मार्फत अहिराणी भाषा, प्रचार, प्रसार व संवर्धनाचे अनेक उपक्रम करण्यात येतात. त्यापैकी ई स २०२३ पासून अहिराणी दिन दर्शिका छापली जातं आहे. ती आता या वर्षी म्हणजे ई स २०२४ चीही छापली आहे. त्याचा प्रकाशन सोहळा नुकताच छ संभाजीनगर येथे पार पडला. मराठवाडा विभागाने आयोजित केलेल्या या समारंभास उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पाटील sir प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्थानिक पदाधिकारी सर्वंश्री विनायक पवार, आण्णासाहेब गायके, दौलतराव सोनवणे, कैलास पाटील, सनेर साहेब, भय्यासाहेब पाटील आणि ईतर मान्यवर हजर होते.
या दिनदर्शिकेच वैशिष्ट्ये असे कीं ही दिन दर्शिका संपूर्ण अहिराणीत आहे. अहिराणी भाषेतील मृत होणारे शब्द आपण जिवंत केले आहेत.
महिने-चैत, वैशाग, जेठ, आखाड, सरावन, भादा, अस्विन, कार्तिक, मार्गसिस, पुस, माव, फाल्गुन.
पक्ष-शुक्ल/शुद्ध-चान्नी, कृष्ण/वद्य-अंधारी.
तिता-पाडा, बीज, तिज, चौथ, पंचमी, सस्टी, सप्तमी, आस्टमी, नवमी, दसमी, एकादस, बारस, तेरस, चौदस, पुनी, आवस.
वार-आयतवार, सोम्मार, मंगयवार, बुधवार, बिस्तरवार, सुक्करवार, सनवार.
रवीवार म्हणजे सूर्यवार, तस आयत म्हणजे आदित्य म्हणजे सूर्य वारचं, गुररुवार म्हणजे गुरूंचा वार. बिस्तरवारचा अर्थ ही तोच आहे. बिस्तर म्हणजे बृहस्पती, देवांचा गुरु त्याचा वार.
या दिन दर्शिकेत, खान्देशी सण, यात्रा, खांदेशातील थोर व्यतिच्या जयंत्या पुण्यतिथ्या घेतल्या आहेत. यात समावेश नसलेल्या यात्रा, सण, जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या कडे ऑक्टोबर २०२४ मध्ये लिहून पाठवा म्हणजे त्यांचा समावेश पुढच्या वर्षीच्या २०२५ च्या दिनदर्शिकेत करता येईल.
ही दिन दर्शिका आपण 12 पानी छापतो. दर्शनी पानांवर 12 महिणे त्याच्या तारखा, तिथी सण, यात्रा दाखविल्या आहेत. मागील पानांवर आपण खान्देश विषयीची उपयुक्त माहिती छापतो. ती माहिती अहिराणी नसलेल्या लोकांनाही कळावी म्हणून ती मात्र आपण मराठीत छापली आहे.
मागीलवर्षी पहिल अहिराणी दिनदर्शिकेचं विमोचन झालं आणि खान्देशात घराघरात भिंतीवर अहिराणी १०,००० दिनदर्शिका पोहोचली.व्यक्तीविशेषांक असलेलं अद्भुत अहिराणी भाषेच्या समृध्दीचं, संस्कृतीचं व संपन्नतेचं प्रतिक ठरलं…यावर्षी केवळ आणि केवळ जल(पाणी)विषयाचं महत्व आणि गरज विषद करणाऱ्या लेखांचं समृध्द भांडार म्हणजे अहिराणी दिनदर्शिका-२०२४ होय.पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे.पाणी हेच जीवन आहे.जीवन-पाणी=झिरो हे समीकरण बनलं आहे.उत्तर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करणेसाठी जल,जमीन व जंगल यांचं संवर्धन व जतन करणं गरजेचं आहे. वेळीच सावध झालो नाहीतर भविष्यात उत्तर महाराष्ट्राचं वाळवंट होईल.पुढची पिढी आपल्यालाच दोष देईल.हे टाळयचं असेल तर आपण अहिराणी दिनदर्शिकेतील प्रत्येक लेख आपल्या ज्ञानात भर टाकल्याशिवाय राहणार नाही.उत्तर महाराष्ट्रातील प्रस्तावित व प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांची व नदीजोड प्रकल्पांची इंथभूत माहितीचा स्त्रोत ठरेल…अत्यंत वाचनीय, संग्रहणीय लेखांचं आगर म्हणजे अहिराणी दिनदर्शिका-२०२४ होय
संपर्क-
श्री विकास पाटील 9969379654
श्री ए जीं आप्पा पाटील 9082449843
प्राचार्य डॉ प्रशांतदादा पाटीलj 9511859939
बापूसाहेब हटकर – 7710020069