सगळ आठेज सोडीस्न से जान
कितलभी कमाव तून्ही सोन-नांन शेवट ले मातर खाली हातज जांन
खूप मोठा भांदा तू बंगला आणि माडी खेतम्हा भांदी तूना साठे पोहेस्नी कुडी
वाल्ह्या कोळी बनिसन करू नको पाप चांगला कामे कर,मन ठेव आपलं साफ
पैसा वालासण्या पोरी तू करी लयना रात दिन करी न्हायन्यात तूनी दयना
गावम्हा करत जाय गोर गरिबना न्याय वाच गीता रामायनना तु दोन अध्याय
पुरा गाव म्हा तून्ही इज्जत से भारी डोयास वरी नको देखु तू पराई नारी
रात दीन कयात ज्यासना साठे तु कष्ट खावाले देतस त्या तुले बाशि अन उष्ट
माय बाप नी कष्ट करी ईस्टेट कमाळी नको करू तू ह्या संसारणी राख रांगोळी
लाव जिंदगी भर बहीण भासीले पण माया नहीत तुना संसार असाच जाई भाऊ वाया
नको लागु तु तोंड चोपड्या लोकेस्ना भरोसे चल्तीना सगळा शेतस पडतीमा कोंन्ही नहीसे
घरम्हा तूनी बायकोसे सुंदर जशी महारानी नको करू बेकारी,नशा आणि दारू पाणी
धर चांगला,मोठा,हुशार लोकेस्नी संगत फुक्टन खावाले तव्हाज जमी जास पंगत
करू नको तू कटाया ह्या पोरेसले शिकाळ वेळ नको वाया घालू वकील, डॉक्टर बनाळ
कर चांगला कामे करू नको कोन्हा हेवा आयुष्यभर कर तू फक्त माय बाप नी सेवा
खेळू नको पैसा, पत्ता, जुगार आणि सट्टा कसाले लाव्स माय बापना इज्जत ले बट्टा
भरपूर कमाडी तू पत,आणि खेती बाडी म्हस्न्टीम्हा उनात पण तूले एकटाले सोडी
ऐक थोड्या फार गोष्टी सेतीस याम्हा कामन्या हात जोडीसन सगस दादा करस तुन्ह्या रावन्या
समसुदोहा दगुशाह टिटवीवाले (जळगाव) 9822901035

वज्जी भारी!