शेतकरी नी दिवाई

शेतकरी नी दिवाई

व्हनी दिवाळी हायी
दिवाळं काढाले
ह्या शेतकरी राजाना
ती जीव घेवाले

भाव नही म्हणा
कोणता पिकले
जाऊ कशा मी
कपडा घेवाले

सरकार वाटस बोनस
सरकारी नोकरले
आणि भाव पाडी मारस
शेतकरी राजाले

व्हनी दिवाळी हायी
दिवाळं काढाले..

पो-या पाहतस
मन्हा तोंडकडे
मी पाहस त्या
उभा पिककडे

साडी कशी घेऊ मी
घरनी लक्ष्मीले
हमी भावच नही से
जर मना पिकले

व्हनी दिवाळी हायी
दिवाळं काढाले..

कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211