येय ना वारे
येय ना वारे,
गधड चरे,
आशी गत से,
पायजे तव्हय कोठे मरे?१
जसा मानुस चगी ग्या,
तसाज निसर्गबी,
जसा राजा तशी प्रजा,
तसाच पावसायाबी.२
पावसायाम्हा बेटाईम,
हिवायाम्हा आवकाई,
हाऊ ऋतू तठे ,तो आठे,*उंढायाम्हा येन्हा भरोसा नयी.३
कोन्हले साव ते कोन्हले पाव,
पाचपन्नास वरीस पयले,
आसा चगेल चाया नयी व्हये,
टेकीज दे तो जूनना पयला हाप्ताले.४
तो कायी सुधरावू नयी,
आपलेज सरय व्हन पडीन,
पर्यावरन रक्सनले जुपी लेन पडीन,
आनि जथातथा झाडे लावना पडथीन.५
रचनाकार
मझिसु प्रा.मगन सुर्यवंशी
डोंबिवली-संपर्क संख्याः९७६९४६८३५८.