माय अहिराणी
संस्कृत,मराठी, गुजराती
तिन्ही सख्या बहिणी
माय मराठीनी लेकं
मन्ही मायअहिराणी ।1।
खान्देशना अभिमान
माय मन्हीअहिराणी
शे मवाळ, लडिवाळ
जस दह्यातल लोणी ।2।
दही साखरनी चव
तोंडले येई पाणी
ज्ञानेश्वर माऊली बोले
संस्कृत, मराठी, बागलाणी ।3।
शे तिन्हात खुमार
वेगळा हेल अहिराणी
जरा ऐकी ल्या ओव्या
वाक्प्रचार म्हणी ।4।
शे लेणं बहिणाईन
सदा राही आठवण
मराठी साहित्यले दिध
दिध काव्यमय दान ।5।
सदा पोटामधी माया
तिले परकं नहीं कोणी
सदा डोयामधी आसूं
अशी माय अहिराणी ।6।
कुणी म्हणतसं खान्देशी
कुणी म्हणतसं अहिराणी
भाग- जाती नुसार
तिन्ह्या अनेक बहिणी ।7।
माय धुयं, जयगाव,
नाशिक, नंदुरबारनी
माय मराठीनी लेक
माय मन्हीअहिराणी ।8।
जोडशब्दन भांडार
माय सुंदर शे मन्ही
शे ज्ञाननं कोठार
ओव्या ,साहित्य,गाणी ।9।
बाराशे सहाना आधीना
इतिहास मन्हीअहिराणींना
प्रभाव मन्हीअहिराणीवर
मराठी, गुजराती, वऱ्हाडीना ।10।
सरय विनोदी सुंदर शे
लेक माय मराठीनी
रस अनिक शृंगार शे
मन्ही माय अहिराणी ।11।
कवी – अरुण आहिरे
मो. न. 9096665207
