मन्ही बहिना बहिना खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता

मन्ही बहिना बहिना खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता


मन्ही बहिना बहिना
माले इना अभिमान
इना सारखं वं कोठे
नही देखायनं गानं॥धृ॥
मन माले बहिनानी
आसं दिन्हं वं आंदन
तिन्हा गत नही पन
मीबी उगायं चंदन॥१॥
मन मन्ही बहिनानं
जसं सोनानं वं नानं
तिन्हा गत नही पन
माले सुचनं वं गानं॥२॥
गानं मन्ही बहिनानं
काय सांगू वं देखनं
तिन्हा गत नही पन
लिखं मीबी वं सुखनं॥३॥
कधी सुखनं दुखनं
दुनियाना वं हितनं
कधी रित नं भातनं
गानं आख्खं जीवननं॥४॥
काय सांगू कवतिक
बहिनाना गानासनं
एक एकना मनम्हा
इनी जमाड आसन॥५॥


–निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगाव .
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.


मन्ही =माझी, माले =मला, इना=हिच्या, देखायनं =पाहण्यात आलं, दिन्हं=दिलं, गत= सारखं, तिन्हा =तिच्या, उगायं=उगाळलं, नानं=नाणं, लिखं=लिहिलं, मीबी=मीही, कवतिक =कौतुक, गानासनं=गाण्यांचं, जमाड= जमवलं.