भरभर अहिराणीती पाऊस कविता

भरभर अहिराणीती पाऊस कविता

भरभर

आठे तठे सर वर सर,
जथा तथा भरभर,
वती राहायना जिमीनवर,
पानी पयी राहायन वरनावर. 1

जिराले मुराले,
जागाच कोठे,
शून्य शीतलासले,
सिमिंट जठे तठे. 2

बिचारा झोपडीवाला,
घरमा पानी, दारम्हा पानी,
रस्ता वल्लाच  वल्ला,
तो कोन्हाज नयी ध्यानीमनी. 3

बयीन (बळी)कायीचं,
माल्हे माहीत नयी,
पन निश्चिंत व्हयीचं,                                    
आते लोंग कायजी नयी. 4

पन आते पानी झेलानी,
मुरावानी, जिरावानी,
कायजी पडीन लेनी,
आते नयी ते कव्हय कयीन? 5


मझिसु  प्रा. मगन सुर्यवंशी