प्रेम ना गुथ्था Ahirani kavita

प्रेम ना गुथ्था Ahirani Kavita

त्याले मी ते सांग व्हतं
घडी घडी येऊ नको
बिगी बिगी मनाकडे
तू आते पाहू नको!

ह्या धबावर त्या धबावर
उड्या तू मारु नको
मन्हं घर पत्रानं से
तू पत्रा फाडी येऊ नको!

तुनं मन्हं प्रेम आते
व्हयी गये ना रे जुनं
आते काय राहिन सांग
तुनं म्हना कडे घेणं!

लगन मन्हं ठरी गये
साखरपुडा व्हयी गया
कोणले कळू नही म्हनी
तुले मी भाऊ कया!

लगनले तुले येनं पडयी
बुंधी तुलेच वाढनी पडयी
कोणले काय कमी से
ते भी तुलेच पाहनं पडयी!

तुना दाजीना पुढे पुढे
उभं भी तुलेच राहनं से
सकाळ माले पो-या झया
मामा भी तुलेच व्हनं से!

तुनं मन्हं प्रेम हायी
आते कधी संपाव नही
मन्हा सारखी बहिण तुले
जगमा कुठेच भेटाव नही!

कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211