पस्तावा अहिराणी कथा

पस्तावा अहिराणी कथा

. . . . ” पस्तावा ”

ही अहिराणी कथा आपणा साठी . . . नाम्या शिक्षणाअभावी त्याच्या वर काय प्रसंग ओढवतो हे या कथेत मांडण्याचा प्रयत्न केलाय . कथा फार दिवसांपूर्वी लिहिली होती . आज योग रयतेचा आवाज या निमित्ताने आलाय ..

. . . . . ” नाम्या ..! ” …..

नाम्या म्हंजी भलता एक नंबरी पोरगा बरं का ! सावया रंगना . आपला नाकना शेंडाना समोरच चालनारा . गाव मा शे का नई त्याना सासुलच नई लागे ना हो .. बये इतला कसा शांत सोभ्भावना व्हता कायजान ? घरमा अठरा ईश्व का काय म्हंतस ना ते दरिदरी . मायना बापना एकुलता एक पोरगा . पन झाये काय तो तीन चारच वरीसना व्हता हो ‘ बये तवय त्याना बाप त्यासले सोडी ग्या . देवना घर . माय त्यानी रड रडनी हो . रड रड रडनी बिच्चारी . एव्हढा भरेल घरमा सवसार सोडीसन तिना कुकू पुसायना . काय करी हो ती बी नसीबना पुढे ? नवरा तिना सुतारी काम करे . गव्हाईना कामे . वल्लो पारजीत येवसाय व्हता तो . नांगरना फाया ‘ वखरना ‘ खेती कामना अवजारे ‘ पामर असा बठ्ठा बठ्ठा कामे करे बिचारा . बैल गाडासना आंकना कामे तोच करे . पन नसीबना मव्हरे कोन कदय चालन कां ? नई ..! त्यानावरच त्यासनी गुजरान चाले . पन आते उनी का पंचाईत ? इवुडसा घाकलसा पोरगा लिसन ती माऊली कथी जाई हो ? आनी दखा कवलोंग रडत बसी ती ? सांगा ना तुमीन ‘ कवलोंग रडत बशी बरं ती आपला करमले ? दोन दिन रडी लिनं आनी लागनी बिचारी लोकेसना वावरेसमा कामले . कचरा येचाले ‘ निंदा खूपाले ‘ वावरेसमा कामे कराले लागनी . झाडले लेकरूनी झोयी टांगी दे आनी कामेसले लागी जाये . घाम गाया सिवा ईलाजच नई व्हता . पन मंडई दिवस कोना करता बठी ऱ्हास का ? नाम्या आते मोठा व्हई गयथा . मायनी त्याले शायमा घालं . पाटी पुस्तक लि दिनं . ” नाम्या शायमा जायरे ss ‘ शायमा जायरे भाऊ ‘ दख तुले पाटी पुस्तक लि दिनं . ऐक बरं ! ” पन नाम्यानं डोकं चालीन तवय ते ना ! खेयामा ‘ खेयामाच येडा व्हता तो . ती म्हने ” अरे नाम्या ‘ तुना बाप ‘ गन राबना ‘ त्या नई शिकनात ‘ तु ते शिक . पन नाम्यानं शिकामा मनच लागनं नई हो . तो बी मंग काय करी हो ? नई का ? आपला बापना येवसायमाच तो मंग चित घालाले लागना . धाकला मोठा कामे कराले लागना . पन मंडई ‘ झाये काय ‘ त्या सालले पाऊसनी दगा दिना हो . पिके बठ्ठा बयी ग्यात . हेरी कोल्ल्या खटक व्हई त्यात . पेवाले पानीनी मारामारी . दुबार पेरनीना बी उप्योग झाया नई . ढोरेसले चारा नई . गुरे ढोरे उपाशी मराले लागनात . भलती भयान परिस्थिती झायी . मंग कथाईन शेतकरीसना कामे नाम्याले भेटतीन हो ? बठ्ठ्या हेरी कोल्ल्या खटक . पेवाना पानीनी मारामारी . पार बल्लासना हेठे पाच सहा कोस पेवानं पानी लेवाले जानं पडे . उपासमारी वाढनी व्हती . नाम्या आते मोठा व्हई गयथा . त्याले समजाले लागनं व्हतं . तो मायले बोलना ” माडी ‘ मी सहेरमा जास ‘ तठे काम दखस . आठे आते राहीसन उपयोग नई . कितला दिन जीवले बायो ss ? ” माय बिचारी ऐकीसन तर रडालेच लागनी . तिनी पोर्‍याले कदी एकटं सोडेल नई व्हतं . रडू ये तिले पन काय करी ? वखतच तसा पडेल व्हता . भयान दुसकाय . ती बी काय करी ? छातीवर दगड ठिसन नाम्याले गाव धाड् . नाम्याले निरोप दिना . ” जाय माय सहेरमा . नेंबन राहयजो बरं ! ” नाम्या ना डोया मा पानी व्हतं . माय कडे दखत जाये आनी तो सहेर कडे येवाले निंघना . सहेरमा दोन तिन दिन कामना शोधमा अथा तथा गन भटकना तो . भटकी भटकी दमी जाये . रात झायी का धरमशायामा ईसन काईतरी पोटमा कोंबीसन तांब्याभर पानी घटघटा वतं का जपी राहे . तीन चार दिन असंच चालनं . मंग एक दिन त्याले लाकडेसना वखारमा लाकुड कापाना मशिनवर काम भेटनं . बापनी पुन्याईच म्हना ! वखारमा कामले जावा पासीन तो दोन पैसा कमावाले लागना व्हता . वखारना जोडेच झोपडपट्टी व्हती . तठे त्याले एक फळ्या सन त्याना पुरतं धाकलसं घर भेटनं . कष्ट करी कामगारेसनी वस्ती व्हती ती . सहेरपासून वखार थोडी दूर व्हती . संध्याकायले घर ऊना का वखार म्हातल्या झिलप्या गोया करे . आनी त्यानावर तांदुय लाईसन मस्त खिचडी करी ले . पोटभर पानी पिना का कवय डोया लागेत हाई बी त्याले कये नई . ती बठ्ठी कष्टकरी कामगार सनी वस्ती व्हती . वखार म्हातला बठ्ठा मजुर तठेच त्या झोपड पट्टीमा राहेत . . दहा बारा झोपड्या व्हत्यात तठे . तो बी त्यासमा रमी गयथा . पन त्याले ये कोठे भेटे . ? एक दिन काय झाये ‘ त्याले एक पत्र उनं . तवय पोस्टना पत्राना जमाना व्हता . मोबाईल बिबाईल नई व्हतात . पोस्टमन त्याना झोपडीमा पत्र भिरकाईसन चालना ग्या . पत्र दिन भर पडनं . नाम्या दिनमावताले घर येस . तो जवय घर उना त्यानी दखं बये ‘ पत्र कोनं शे ss ? चिमनी लाई दखं पत्र त्याले वाचता कोठे ये ? ती बठ्ठी अडानी वस्ती व्हती . आख्खा अंगठेबहाद्दर . त्यानी उलट पुलट करी त्या पत्रा कडे दखं आनी तसच एक डबावर ठी दिनं . सैपाक कया . जेवना पोटभर पानी पिना आनी थकी भागी येल व्हता तो . ते पत्र तसंच पडनं . थकेल व्हता त्याले पडताच जप लागी गयी . ते पत्र तसच पडनं . शिकेल राहता ते वाचीसन मोक्या व्हई जाता . सक्काय झायी पत्र कोनी वाची म्हनीसन दखाले लागना . पन तठे बठ्ठाच अडानी मजुर व्हतात . कोनलेच वाचता येनार नई व्हतं . मनमा न मनमा त्याले पसतावा उना . बये ‘ अपुन कदी शिकेल राहतुत ते हाई नवबत कसाले येती ? ” माय गन वरडे ” अरे नाम्या सायमा जायरे भाऊ ‘ सायमा जायरे भाऊ बये तवय आपुन ऐकं नई . पन आते पसतावा करीसन काय उपयोग व्हता . तो ताडकन उठीसन भाहिर उना तवय सक्कायमा रोज एक मास्तर तथाईन कोठे तरी सायकल वर जास तो रोज दखे . तथाच कथा तरी शिकाडाले जाये तो . तवसामा मास्तरनी सायकलनी घंटी ना आवाज उना . त्यानी मास्तरले हाका मारीसन थांबाड . मास्तर थांबनात . तवसामा ते आजुबाजुना बायासले ते तवयच सुगावा लागी गयथा . बायाबी जमन्यात . जानु नाम्या मास्तर ले काबरं थांबाड ? तवसामा नाम्या नी ते पोस्टानं येल पत्र मास्तर ना मव्हरे धरं ” मास्तर दखा हो काय शे ते ? ” मास्तरनी पत्रावर नजर टाकी . आनी मास्तरना चेहराच बदली ग्या . तो मास्तरना चेहरा दखी सन नाम्यानी ईचारं ” काय झाये हो मास्तर ? ” मास्तर नी पुरं पत्र वाचं . त्या ते थंडागारच पडी ग्यात . ” काय झाये हो ? ” ” थांब रे बाबा । ” हं ss ! सांगतो ” अरे लई वंगाळ बात हाये बघ । ” नाम्या बोलना ” पन काय झाये हो मास्तर ? सांगशात ते खरी . ” पन मास्तरना चेहरा दखीसन नाम्यानी चिंता आणखी वाढनी . असं काय पत्रामा शे ? मास्तरनी त्याना खांद्यावर हात ठेवा . आनी बोलनात ” तुझी आई खूप आजारी होती . तुझ्याच नावाचा जप करीत होती . शेवटच्या क्षणापर्यंत तुझी वाट बघीतली . ” नाम्या ‘ नाम्या ss ‘ तुझाच ध्यास घेऊन बसली होती . ” तसा नाम्या हरकी ग्या बरं ! मनमान मनमा सोयता ले कोसाले लागना बये दोन दिन पाईन पत्र घरमा पडेल व्हतं . हाई काय झाये मनावरी ? ” मायनी भेट व्हवाव नई आते . तो रडाले लागना . मास्तरनी पन समजाड त्याले . तशी गर्दी जमा व्हई गई . कोनी काय सांगे कोनी काय सांगे पन आनी तो आकांत करीसन रडाले लागना . तो ठायकेच पस्तावा करे . ” बये घरमा पत्र पडेल व्हतं . माले जर वाचता येतं ते मी शिकेल राहतु ते पत्र वाचीसन जल्दी जाता येतं . मायना उपचार करता येतात . ‘ आखरी मुख दर्शन तरी व्हई जातं मायनं . पन आते पस्ताईसन काय उपयोग व्हता ? बायासनी गंज समजाड त्याले . ” भाऊ निंघ आते . ” मायनी तुनाच व्हका धरेल शे . जाय पटकन . ” तो तस्साच एस .टी स्टँड वर गया . गाडी मा बसना . सुम बशेल व्हता गडी . मायनी यादमा त्याना डोया भरी येत . डोया पुसत जाये . ईचार करत जाये . ईचार ईचारमा गाव कवय उनं ते पन कयनं नई . गाडीम्हाईन उतरना ‘ आनी घरकडे पयतच गया . त्याले ओढ लागेल व्हती . गावना लोकेसनी मज वाट दखी त्यानी . पन इतला ये प्रेत ठेवता येत नई . म्हनीसन मायले गावना लोकेसनी ही मीसन सती गती लाई दिंथ . तो येताच ढोर ना मायेक तो अल्लायना . गावना लोकेसनी त्याले समजाड्.. नाम्या ‘ तुना मायनी तुनी गंजच वाट दखी भो ss . तिना प्रान जाता जाता जात नव्हता . धल्लीना तुना मायना जीव तुनामा अटकेल व्हता . पन तु उशिर करी दिना . तरी तुले पत्र धाड् व्हतं गावना मास्तरनी . ” नाम्या भलता रडना . हुंदक दाटी उंथा त्याना . फुटी फुटी रडना तो . पन आते काय उपयोग व्हता ? त्याले त्याना मायना सब्दे याद उनात ” भाऊ ‘ नाम्या शायमा जायरे ‘ शायमा जायरे मना दादा ‘ शिकी सवरीसन मोठा व्हय भाऊ तु ” . शिकेल सवरेल ऱ्हाता ते ह्या दिन येतात का ? तर मंडई ईचार करा सारखी गोट शे तरी गोजा बाई बोलनीच त्याले ” नाम्या तुना मायनी तुनी भलती वाट दखी भो . भलता उशिर क्या भो ” पन तुमीन काई बी म्हना त्याले हाऊ मातर ” पसतावा ” राही ग्या .

विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343 ……

पस्तावा अहिराणी कथा
पस्तावा अहिराणी कथा