खानदेश साहित्य संघ आयोजित सातवे अखिल भारतीय अहिराणी कवी संमेलन धुळे
25 फेब्रुवारी 20 24
कवितान नाव :-देव मल्हारी
देव मल्हारी रुसना
देव खंडोबा रुसना
गया घोडा वर बसीन
गया बानुले लेवाले
म्हाळसा लगीननी आशीन
||ध||
झाया घोडा वर ताट
गया चंदनपुरीले
तठे व्हयना नोकर बानूना वाडाले
काम करस चौकस बानूना धाकमा ||1||
या बानूना घरनी खास ताक नि भाकर
देव चारस मेंढर या गिरणा नदीमा
बोलस बानु गोड गोड
देव गालमा हासस
||२||
देवबा कसं बरं सांगू
देवबा तुम्हीसनी ऐका
नुसता खेळ नही करू
दोन बाईसना
तुमीसन गया पासीन
चित नही लागस घरमा
||३||
सौ चंद्रकला प्रमोद अमृतकर
धुळे