“देव बठ्ठ देखस” :
n
“””””””””””””””””””””””””
n
(प्रा. बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३)

रातनं जेवन व्हयनं की शतपावली कराना मन्हा नितनेम शे. रोजनामाईक कालदीन रातनं जेवन व्हयनं आनी धाकला डिकरा “ओम” ले संगे लिसन आम्ही भाईर फिराले निंघनूत. घरफाईन थोडं दूर गऊत आनी भसकन लाईटं बंद व्हई गयात. पानी पावसायानी अशी गंजचदा लाईन जाय ये करत रहास. धाकला “ओम” बिचकाई गया. मी खिसाम्हातला मोबाईल काढा. तेन्ही बॅटरीक चालू करी. आनी त्या आंधूक परकासम्हा आम्ही चालाले लागनूत. वाटम्हा एक ठिकाने मंडपम्हा गणपती बाप्पा बसेल व्हतात. मी आंधारामां बाप्पाना आदमास लिसन श्री गणेशले हात जोडात. मंडपम्हा गडूप आंधारं. मूर्ती काई दिखाये नही. पन भक्तिभाव, सवयथून हाथ जुडनातच.
nn
ते दखी ओमनी इचारं.
n
“पप्पा, मंडपम्हा तं आंधारं शे ? बाप्पातं दिखत नही ? मंग तुम्ही नमस्कार कोन्हले करा ? आंधाराम्हा तुम्हना नमस्कार देवले दिखीन का ? “
n
तेन्हा सवाल रोकडा व्हतात. मी तेल्हे सांगं.
n
“बेटा, देव सर्व शक्तीमान रहास. देव बठ्ठ देखस. तो देव शे ना. म्हनून तो सर्वाज ठिकाने रहास. आनी सर्व देखस.”
nn
मी सांगेल” ओम”ले कितलं समजनं ते माल्हे माहित नही. पन, मन्हा मनम्हा इचारस्नी टूबलाईट चमकनी. देव शे का नही शे.? हाऊ तसा संशोधनना विषय शे. ज्ञानी – अभ्यासू ती चर्चा करतसज. रिकामं रिकामं गंजच कूटबी पाडतस. पन देव शे हाई श्रध्दा मानी, तर कितला मोठा आधार भेटस. जव्हय मानुस संकटम्हा सापडस, तव्हय तेल्हे फक्त देवज याद येस. तो शे हाई नुसती श्रध्दाबी, मानुसले जगानं बय देस. लढानी हिम्मत देस.
nn
जव्हय दवाखानाम्हा आपलं मानूस भर्ती रहास, तव्हय आपन डाक्टरन्या कितल्या किलावन्या करतस. तव्हय डाॅक्टरम्हाज आपले देव दिखस. त्या सांगतंस. आम्हीतं गंज प्रयत्न करी ऱ्हायनूत. पन आते पुढे सर्व, त्या वरलांनां हाथ म्हा शे. तेन्हावर भरोसा ठेवा. तो वरला म्हंजेच, देवनं हो ! जेन्ही हाई जग बनाडं. जन, जनावर, झाडं, झुडपं, हवा-पानी तेन्ही तं बनाडेल शेत न्हा. महात्मा ज्योतिबा फुलेस्नी देव नाकारा. पन हाई सृष्टी जेन्ही बनाई, त्या निर्मिकले, तेस्नीबी मानज की नयी ? त्या निर्मिकले, तेन्ही शक्तीले आनी तेन्हं आस्तित्वले मानं तरी गंज शे. श्रध्दा जोयजे, पन ती अंधश्रद्धाम्हा बदलाले नको. श्रध्दा आनी आंधश्रध्दाम्हा एक आंधूक लक्ष्मन-रेषा रहास. ती जेल्हे समजनी तेन्हा उध्दार निश्चित शे.
nn
देव शे, तो बठ्ठा ठिकाने शे आनी तो बठ्ठ देखस. देखेल नी नोंद ठेवस. चांगलं काम करनारले बक्षिस देस आनी वाईट काम करनारस्ले शिक्षा करस. इतलं मानं, तरी जगम्हा बठ्ठा कामं बिनबोभाट चालथीन. “देव बठ्ठ देखस” हाई जर मनम्हा बठनं, तं कोन्हीबी, कोठेबी चूकीनं वागाऊ नही. चोरी चपाटी, वाईट काम कऱ्हाऊ नही. मापम्हा पाप करतांना, दुधम्हा पानी टाकतांना तेले देव दिखीन. लांडीलबाडी करतांना देव दिखीन. लेकीबाईस्कडे वाईट नजर टाकता, तेन्हा मनम्हा कापरं भराईन. पापज व्हवाऊ नहीनं. तो बठ्ठ देखस, आनी चूकीनं काम करं की शिक्षा भेटस, इतलं ज्ञानबी उनं, तरी पोलीसं आनी पोलिस ठेसननं काम उराऊ नही. मनवर एक प्रकारना वचक बठी. अनिती कम व्हईन आनी लोकं नितीथून वागथीन. जगम्हा थोडीफार नितीमत्ता शे, म्हनीसन हाई जग चाली राहिनं.
nn
पंढरपूरनी जत्राले वारीम्हा चालनारा वारकरी तं असं मानतस की पांडूरंग तेस्ना बरोबर रहास, वारी म्हा. वारी जशी पंढरपूर भिडस तसा मंदीरम्हातला ईठोबा मंदीर सोडी, वारकरीस्मा खेवाले निंघी जास असा समज शे. त्या म्हंतसज्ना.
nn
रिकामा गाभारा, भक्त त्या चिंताम्हा,
n
रवस वारीम्हा, पांडूरंग !
nn
खरंज शेनं, माना तं देव शे. मंग, तो भक्तना मदतले ईसन उभा ऱ्हास. पन तो बी भक्तस्ले सांगस. काम-कष्ट करा. प्रयत्न करा. निकाम्याले तोबी मदत करत नही. महाभारतना युध्द म्हा, भगवान श्री कृष्ण अर्जून ना सखा, नातेवाईक व्हता. पन तेन्ही अर्जूनलेज युध्द कराले लावं. तेन्ही फक्त मार्ग दावा. स्वतः काही करं नही. भक्तकडथून काम करी लिन्ह. कोन्ही कर्म करं, की तो फय देसच. तो म्हनसज नां.
nn
तुम्ही कर्म करत रहा, मी फय देसू,
n
व्हयीन गरज तव्हय, मी मदतले येसू.
nn
म्हनीसन देवले नही, तं त्या नियंताले मानालेज जोयजे. असं माले मनोमन पटनं. थोडं चालीसन आम्ही दोन्ही घरकडे परतनूत. बाप्पाना मंडपफान उनूत. आनी अचानक लाईन उनी. एकदम उजायं पडनं. “ओम” एकदम खुश व्हयना. मंडपम्हा आते जथा तथा धूम परकास व्हता. मंडपम्हा लायेल लाऊडस्पीकर कोकाई ऱ्हायंथा. गणपती बाप्पा दिखी ऱ्हायन्ता. “ओम” आनी “मी” दोन्हीस्नी भक्तीभावथून हात जोडात. बाप्पा मजानं हासी ऱ्हायना, असा माले भास व्हयना. मंदीरम्हा तं उजायं पडेलज व्हतं. मन्हा हिरदम्हा बी इचारस्नं उजायं पडनं. आते मार्ग, लख्ख चमकी ऱ्हायन्ता. आम्ही निचित मनथून घरकडे निंघनूत. गानं निऱ्हाट वाजी ऱ्हायंत……..
nn
देवा हो देवा गणपती देवा, तुमसे बढकर कौन,
n
और तुम्हारे भक्त गणोमे, हमसे बढकर कौन ?
nn
© प्रा. बी.एन.चौधरी.
n
(९४२३४९२५९३)