देखा भो
देखा भो कोठेच पहिला सारखं
काहीच नही ऱ्हायेल से आते
सर्व जग बदली जायेल से भो
जो तो काममा गूंग से आते
आंगन कोनी सारतांना दिसत नही
सडा रांगोयी कोनी टाकतस नही
वासुदेव कोठेच नजर पडत नही
रामपहायरंमा भोंगा आयकू येत नही
पहिला जमाना ऱ्हाहीना नही
येरायेरनं कोनी आयकत नही
मोठा माणूसना मान ठेवतस नही
नयतरना पोरे समजी लेतस नही
टाईमवर लगीन हायी लागत नही
बामनं पंचांग कोनी मानत नही
केयंना पानवर पंगत दिसत नही
अक्षदा टाकाले कोनीच थांबत नही
कवी. दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३
