सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुये
दुसकाळ
नियं नियं शेत बठ्ठ l
पाह्य पिवय पडणं ll
थेंब नहींरें पाणींना l
साल शे दुसकाळनं ll1ll
एक एक थेंब साठे l
आठे जिव आसूसना ll
वाट पाहिसनी राजा l
आसू सरना सरना ll2ll
तुले कशी देवबा रें l
येत नहीं मन्ही कीव ll
पाणी वाचुन कोयडी l
मन्हा शिवारनी शिव ll3ll
मन्हा वावरमां यंदा l
व्हतं पिकन रें सोनं ll
थेंब नहींरें पाणींना l
झाय झाय समशान ll4ll
मका पिवया पडना l
जयी गय सोयाबीन ll
सांग सांग कश फेडू l
सावकारनं है रीन ll5ll
तुन्हा वरच शे राजा l
मन्ही बठ्ठी जिंदगानी ll
पड वावरमां मन्हा l
व्हऊ देरे आबादाणी ll6ll
कवी ,,भावेश सुनिता चंद्रकांत जाधव✒️✒️
जिल्हा धुळे
