दिवायी Khadeshi Ahirani Diwali Kavita
उना दिवायीना सण संगे त्यान्हं धनगोत…
गाय गोहानी बारस पुंजे दिवासंगे जोत..
बारसना माग काढी पाय तेरसनी ठेवा…
धन पुंजाले बसनी तील्हे तेजोरीना हेवा..
नरक्याना चावदस कसा होईन तो मांघे…
सांगे फेडा रे इटाय धवा उटनाम्हा आंगे.
लक्सुमिले नारायण हात जोडीसन पुंजे….
वात लागताच दिवा खाले आंधाराले बुजे.
उखल्लाना कडे खांदे दिवा का बं भारी भरे…
फेडे उखल्लाना पांग वन्हे उजाये आथरे..
दिवायीना पाडवानी बळी जमीनम्हा गाडा…
बुट्या बेंगननी त्येंले भेस बदलाई नाडा..
उना पाडवा नजिक धाक बहीणना पोटे…
बीज भाऊले ओवाये मोडे कानव्हर बोटे.
कवी प्रकाश जी पाटील पिंगळवाडे, ता. अमळनेर. मो. ९७६३९१११४०
