दिवाई आनि आम्हनं धाकलपन khandeshi Diwali

दिवाई आनि आम्हनं धाकलपन khandeshi Diwali


काय व्हये दिवाईले?कसा व्हये दिवाईना सन ,आम्हना येयले?
दिवाईनी सूरुवात व्हये गाय-गोर्हानी बारसले[गोवत्स द्वादशी].
गाई,वासरं,हैशी,पाल्ल्या,हेलगा
ज्या आसतीन ते कुरषीधन.
आंगनम्हा,मांडोम्हा,वाडघाम्हा,खयामा,मयाम्हा बांधेल.बठ्ठास्ले लवनम्हा पानी आसीनते लवानम्हा,नहीते हायवर.
तेस्ले खराटावर घसडिघसडी आंगोयी घालूत.एकदम टकाटक चमकाडूत.
म्हैस,पाल्ल्या,हेला कायाजम होस्तोवर.
गाय,गोरा,वासरी व्हयीजायेत जशी नवरी.
त्याबी पडी जायेत चक्करम्हा.
पन भलता गोड दिखेत.
तेस्ले धुयीचुयीसन,मंग तेस्ना शिंगडा रंगाडूत,धाव लाईसन.
मंग माय तेस्नी पूंजा करे.
ताटम्हा हातनी पेरेल बाजरीना पिठनी भाकर.
जी आसीन ती भाजी कुस्करीसन,
परतेकले घास भरे मन्ही माय.
भलतं आपरुक लागे.आनि बट्टा ढोरेस्ना चेहरा धाकल्ला पोरेस्नामाईक दिसेत त्यादिन.
त्याच हातबाजरीना भाकरवर उपास सोडे मन्ही माय.
शिकेल आजिबात नही व्हथी.पन तिन्ही ऋषीपंचमी,कृष्णजन्मदिनना उपास.गायगोराना बारसना उपास एकदम कडक रहाये.तोंडम्हा पानीबी नयी लेये उपास सोडा लोंग.
मंग ये धनतेरस .म्हंजे कुनबीना भाकड दिन.कायीच माहित नही,
ना कुबेर-पूजन ना धन-पूजन,
इच्चूनं बिढ्यार पाठवर.
खडकू,ढब्बू पैसा,आधेलाना येव्हार.आंगव्हर रहाये तेव्हढच सोन-नानं.पाटल्या,चांदीना गोट-कडा,पायम्हा बेला,
गयाम्हा मंगयसुत्र गाठलाम्हा आटकायेल.
बस जलमभर तेच रहाये आंगवर.
दारुड्या नवरा नसीनते!
नहीते मंग लंकानी पार्वती!
कपायभर कुकु एवढूस मंगयसुत्र लोकलाजे.
मंग धनतेरस कोन करे?
पांढपेशी मंडई. शिपा,सोनार,वान्या,बामन.म्हंजे
धोतरले डाग लागू नही देनारास्ना घर .तेस्ना सगळा पुरुष मंडई म्हंजे शेट नयी ते पंत,
आनि कुनबी?येडा-बांग्या,मयेल कपडा ,फाटेल जुत्ता नयीते इवान टायरनी आठानानी चप्पल.
पान-सुपारीले बलावन व्हये.
न्हाई म्हंजे राऊतबाबा निवतं दी जाये.कुनबीले कितल आपरुक लागे.
आम्हना बाप जाये,सजीधजी,
डोकावर सालू[धव्वे उपरन सालू म्हंजे लाल फेटावर].धव्ही कुडची,
एक-काष्टी धोतर,पायम्हा बिनबनना काया जुत्ता,
मन्हा बाप ढोर मेहनत करे,

दिवाईनी उनी गर्दी

पन सनपानना कपडा जोडास्म्हा आजिबात तडजोड नही करे.
कमायेलबठ्ठा पैसा मायफान दे मन्हा बाप.फगत खिसाम्हा जडापत्तानी तांबाखु भरेल रहाये.
तीबी जसा माल्हे पोरे मोठा व्हवाले लागनात,शिकेल नात-नातूले वास जावाले नही जोयजेल म्हनुन तंबाखू सोडी दिधी, मरालोंग मांघे फिरी दख नही.भलता एकवचनी आनि तत्वाना मानसे होतात त्या.
पयली पंढरी नी वारी करी,
चायीसना घरम्हा,
तव्हयपासून मन्हा बापनी मासमच्छी मटनले तोंड लावं नही
सेवटलोंग.
मी भी तेस्नी चिता रचायनी,
५मे१९८७ले आनि मी भी
पानी सोडं.पानी देतांना बापले वचन दिध मनम्हानमनम्हा आज पासून तुम्हनासारख मासमच्छीमटन बंद.तव्हय मी पस्तीशीम्हा व्हथू.[आत्ते मातर कोरोनाम्हा झामलायनू ते डाक्टरनी माल्हे प्रन मोडाले लावा..आत्ते खास आयसतमायसत.]
आशी जाये कोल्ली धनतेरस,वान्याबाम्हना घर,
पानसुपारीम्हा.
मंग ये नरकचतुर्दशी.सक्कायम्हा चार वाजता उठाडी दे माय आम्हले बठ्ठास्ले.गरम तेल[कोमट]नाकम्हा,कानम्हा टाके बाकीनं आंगले चुई दे.हारबरानं पिट,आंगले लाये.
फेनावर बठ्ठा आंगवरना नरक[मय]काढी टाके.
मंग आम्ही पित्तयना देवसारखा व्हयी जावूत. पपलीन नही ते नीळ टाकीसन धोयेल सैनन्या कुडच्या[तिन गुंड्यास्नी]हाफ चड्डी म्हंजे मधला कायम्हास्ली आंडरपँट.
पायम्हा चप्पलना पत्ताच नही.
घरम्हास्ला देवसले आंघोय घाला नंतर इरेस्लेनारय फोडाले जावानं.
पनत्या लायी येवानं संध्याकायले, उखल्लावर,मारुती,मरीमाय,इर-खोकली मायले.
पनत्या समायीशीन घर लयी येवानं.
जमनं ते जोगेना वावारम्हा संध्याकायले बांधवर पनत्या लायी येवानं.
दुफारफासून आंगन झाडीस,
शेनना सडामाराना,
जमथीन तशा रांगोया काढानं.
आनि जेवन काय रहाये?
चावदसले गोड शिय्या,
लक्ष्मी -पूजनले वरनभात,गुईनी लापशी.
पाडवाले पुरनपुयी.
भाऊबीजले बहीन उनीते
वरन पापड्या शिरा.
दिवाईले आज बानावथस तसा फराय नही रहाये.
बारसना दिन माय हारभराना पिटना आनि गहुना पिटना आसा दोन परकारना आटनव दिन पुरथीन आसा लाडू बनायी ठे.
एकदिन फटुकडा फोडाना त्याबी बलीप्रतीपदाले[पाडवाले]
बाकी दिन ,श्यांडशीम्हा घालीशीन टीकल्या फोडान्या.
एकानाम्हा[सहा पैसा]दहा डब्या येत.
दिनभर पुरेत.
पांच दिन.
माय आसा पांच दिन पाच आना दे.
आनि पांच रुप्याना टोपलीभर फटुकडा.
बठ्ठास्ले सारखा वाटीसन भेटेत..
बस्स व्हायनी दिवाई

दिवाईन्या रंम्य आठवनिस्म्हा रमेल

तुम्हले आम्हना परिवार तर्फे वरीसभर पुरथीन इतल्या दिवाईन्या शुभेच्छा

मझिसु प्राचार्य मगन सुर्यवंशी

दिवाई आनि आम्हनं धाकलपन khandeshi Diwali
दिवाई आनि आम्हनं धाकलपन khandeshi Diwali

1 thought on “दिवाई आनि आम्हनं धाकलपन khandeshi Diwali”

Comments are closed.