तुझ्या गंजात लक्ष्मी नांदेल
n
अरुणाग्रज
nn
आज श्रावणी आमावस्या…!
n
पोळा..!
n

मला माहिती आहे…!
n
तू मला आज रिकामा ठेवशील.
n
न्हाऊ घालशील. झुल टाकशील गोंडा बांधशील.
n
सजवशील-धजवशील, गोडधोड खाऊ घालशील.
n
एवढच नाही…!
n
वाजंत्री लाऊन गावंभर मिरवशीलही….!
nn
पण खर सांगू…!
n
पुर्वीचा जिव्हाळा नाही रे राहीला त्यात…!
nn
वाडवडीलां पासून चालत आलेली रित… कुठतरी तगधरुन आहे… बस…!
nn
नाही…! मला मान्य आहे. पुर्वी सारखे कामं नाही राहीलीत माझ्यासाठी तुझ्या कडे..!
nn
होतात ना ती….! माझ्या मदती शिवाय…!
n
तेही वेळ वाचवुन आणि साफसुतरीने…!
nn
हो निश्चितच…..! मला त्यामुळे सुख मिळालं…!
n
नाही पडत जुवार्डी माझ्या गळ्यात, पुर्वी सारखी महिनेच्या महिने….!
n
नाही ओढावा लागत नांगर आता….!
n
वखरटीत ढेकळातून चालतांना नाही भळभळत रक्त माझ्या खुरांमधुन…!
n
वहातुक ही नाही…!
n
त्यामुळे नाही मारावी लागत पत्री मला…!
nn
तू मशीने इजात केलीत ना…!
n
आणि गुरफटून गेला त्यातच. भावना शुन्य होऊन…!
nn
ठिक आहे….!
n
तू ही जरूर धावावं यंत्राच्या नव्यायुगा बरोबर…!
n
व्हावी तुला कमाल कमाई….! जगाच्या स्पर्धेत तुझही नाव उंच व्हावं……!
n
माझी नेहमीच दुवा राहील तुला.!
nn
पण खर सांगू….!
n
पोळ्याच्या निमित्तान वाजणाऱ्या या डफातुन कत्तलखानाच्या मशीनीचा खडखडाट ऐकायला येतो रे…!
n
आणि धस्स होतं छातीत…!
nn
कारण…! चार कोळपण्या फिरल्या म्हणजे …!
n
आता आठ महिने तुझ्या कडे कामच नाही राहील ना मला…!
n
n
माझं बसून खानं, सोडबांध करनं, जीवावर येतं असेल नाही तुझ्या….?
n
एक आणिक खरं आहे…! पारगाची पध्दत सुरु झाल्या पासून मजुरांच ही फावलं आहे…!
n
नाही येत दिवसभराच्या कामाला कोणी….! नाविलाज होतोना तुझा…?
nn
माझ्यामुळे नाही जातायेत तुला कुठे…..!
n
लग्नकार्य, मरन-धरन सोयरीक-संबध, शोकपाणी…राजकारण…!
n
त्यात तुझी प्रायव्हेशी डिस्ट्रब होते…?
nn
‘चारापाण्याची आबाळ करुन कोण पाप माथी मारेलं…!’
n
बघु वेळेवर…..! दोन पैसे गेलेले पुरता …!
n
या बहान्यानं तू खुशाल माझे चार पैसे करून मोकळा होतोस…!
n
नको गड्या वागू असं…!
nn
मी समजू शकतो रे….! तुझं व्यवहारी ज्ञान….!
nn
पण, वाटत रे …!
n
राहावं तुझ्या दारी…! याव मरन देवाघरच…!
nn
लागत तरी किती मला…?
n
फोडील तोटे खुट्यावर बसून मुठ मुठ…! तू टाकशील तसे…!
n
दोन वेळचा पाण्याचा प्रश्न आहे…!
n
तो ही मागे पुढे झाला तर करुन घेईल सहन…!
n
वेळ प्रसंगी राहीलही उन्हातान्हात ऊभा उपाशीपोटी एखादे दिवशी…!
nn
दोन पवठ्या उचलायचा त्रास तेवढा सहन कर….!
n
तेही सोनचं आहे तुझ्या माती साठी…!
nn
चार शिंतोडे आडवायला एक आडोसा अन् छप्पर…थोडा चारा भरायला…!
n
नाही तरी लागतचं ना तुला ते….! आडबारदान ठेवायला…!
nn
चरायला सोडायचा प्रश्न कुठे उरला अलिकडे…?
n
बिघ्या बिघ्याचे बांध मशिनीच्या सहाय्याने काढून बिल्लास बिल्लास करुन ठेवले तुम्ही लोकांनी….!
n
गायरानही काढून मोकळे झालेत सारे….!
n
कुठे पाठीवर गोंडा टाकून उधळायलाही संधी नाही की शिंगाणे माती कोरायला वाव नाही….!
nn
तुझ्या लक्षात एक येईल..? अलीकडे येतात का आमच्या डकारांचे आवाज तुम्हा लोकांना….?
n
आमच्यात लढाई होऊन त्यातून मिळणारा आनंद तर पार विसरला तूम्ही लोकं…!
nn
हो…..! काही शोकीन वागवतात आम्हाला शामीगोंड्यांच्या नांदानं वर्ष दोन वर्ष….!
n
त्यातही अपयश आल म्हणजे संपल…!
n
n
आमच्या आया बहीणी तर कधीच गेल्या तुझ्या खुट्यावरुन….!
nn
पुर्णवेळ दुध व्यवसायीकाकडे आढळतात बिच्याऱ्या….! तेही त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाचा मोबदला मिळवून देत असल्या तर ठेवतो……! नाही तर…!
nn
आठवतो का एके काळचा पोळा तुला…?
n
ज्यांच्या खुट्यावर मी…! त्यांच्या घरी चार दोन माणस असायची सायंकाळी जेवायला आज….!
n
त्यांना ही आस असायची…!
nn
मालक नवा कपडा चढवायचे अंगावर खुशीने….!
n
मालकीनही करायची स्वयंपाक जीव ओतून आणि वाढायची भरल्या मनानं….!
n
आता ना कुणाला भूक, ना कुणी वाढणारा….!
nn
नाही तर अस कर ना…!
n
तुला खरचं खूप अडचण होत असेल माझी…! तर दे सहा महिन्यासाठी ऊस तोडणाऱ्या सोबत पाठवून ….!
n
ओढेल ओझे आनंदान…!काढेल तेथेही तुझ नावं…!
n
येईल परत आणि राबेल आपल्या शेतात….!
nn
चार दोन पावसाळे खाईल…!बघेल सृष्टीच ऋतूचक्र…..!
nn
आणि हो शेवटी थकतीलच माझे हात .पाय…!
n
तेव्हा खुशाल पोहचवून देःःः …!
n
गो शाळेत….!
nn
नाही तरी आजकाल म्हाताऱ्या आई बापांना पाठवतातच आहेत की ….!
n
वृध्दाश्रमात..!
nn
मी ही खुशाल जाईल… !
n
पण नको पाठवू कत्तल खान्यात…!
n
माझी दुवा आहे…..!
n
तुझ्या गंजात लक्ष्मी नांदेल.
nn
कवी-?
n
अरुणाग्रज (शिंदाडकर)
n
9527161626
nn
✒️