तुंनगंम से मनंगंम काब्र नै
तुंनगंम से!मनंगंम काब्र नै
काल्दीन आम्हानां आंगेनां इनोदनी चार चाकी गाडी लिधी!मारुती गाडी से!भलती भारी गाडी से हो!शो रूमतून आनेल नव्वी-कोरी करकरीत गाडी, निस्त दखतच ऱ्हावो अशी से!भारी उठी उठी दिखी ऱ्हायंती!ठायेकचं चमकी-चुमकी ऱ्हायंती!गाडीले फुलेस्ना मोठ्ठा हार भांदेल व्हता!!इनोदना आंगनम्हा गाडी हुभी व्हती!उनी तशी गाडींआंगे गल्लीन्ही गर्दी गोया व्हयी गयी!गल्लीन्ह्या बायास्नी गाडीले ववाई-उवायी लिध!
मन्ह खटलं घरम्हाचं घुसी बठेल व्हतं!हाका मारी बलायी लिध!उनी तोंड पियेत!इनोदनां बाईंनी इन्हाफान ववायानं ताट दिन्ह!आयसत-मयसत ववाई-उवाई लिध!हिना तोंडवर आनंन दिखी नयी ऱ्हायंता!हसरा मुखडा उनम्हा बयेलंना मायेक दिखी ऱ्हायंता!मखडायेंल वांदेरं तीनंतिन्ही आथी-तथी तोंड पियी ऱ्हायंती!तितलाम्हा इनोदन्हा पोऱ्या पेढानां बॉक्स लयी उना!बठ्ठास्नी एक एक करी पेढा उखली लिधा!इन्ही मातर बॉक्सम्हा हात घालीस्नी दोन पेढा उखली लिधात!मी दखतंचं
ऱ्हायी गवू!डोया तानतंच ऱ्हायी गवू!काय शे का हिले?
मी धीरेजकरी हिन्हा कानजोडे यीसनी बोलनू ‘,दोन पेढा उखलानं काय आडी गयेतं तुले?कवरायेलं मत्थीनी!’ ती भी पटकन बोलपन्नी ,’काय कमी शे त्यास्लें?एक पेढा ज्यास्तीं उखली लिधा तें लिधा!एक आपला पिंट्यालें लेयेलं से!आश्या टाईमले तुम्हनं डोकं चालावू नयी?’ मी तिनंगंम दखतचं ऱ्हायी गवू!हावू बठ्ठा पट्टयारांपना व्हता!मी मन्हा तोंडवर मारी लिध!चुप्प बठनू!
मी इनोदसंगे गप्पा-गुप्पा मारी घर उनु! दखं ते घरमां बाई तोंड फुगी बठेल व्हती!मन्ही येवान्हीचं वाट दखी ऱ्हायंती!येता बरोबर उफडाईस्नी मन्हा आंगवर उनी नां हो!बोलाना तोरा दखा आते,’तुम्ही तठे ठोका लोखंडे!हात काया करतं ऱ्हावा!राबत ऱ्हावा!आंगेन्हा चालनात मव्हरे!कव्हयं फ्रिज ल्हेतसं!कव्हयं नव फर्निचर बदलतंस!कव्हयं घरलें न्यामीन रंगरंगोटी करतंस!आते ते फोर व्हीलर लिधी त्यास्नी!तुम्ही फिरा अशाचं त्यास्ना पेढा खात!आनी आम्हले भी फिरावा ती जुनीपटक व्हयेलं एम एटी गाडीवर!सोतानं घर चितकाबरें व्हयी गे त्यांनावर ध्यान नयी तुम्हनी!रंग देवांनं नाव नयी!’ बाई जराखी तोराम्हाचं व्हती!
काय सांगो आते!मी बोलनू,’ आवं!त्यास्नी कमाई कितली से!सरकारी नवकरी से त्यान्ही!आते सरकारी मानसेस्ना पगार पानी वाढी जायेलं से!पहिलेंग सारखं थोडी से त्यास्न!वेतन आयोगनी दनकाडी पगार वाढायी देयेल से त्यासले!त्यास्नी आयपत से!लेतंस व्हतीन त्या!तुले काब्र जबून लागी ऱ्हायनं?’ ती आखों इस्मरिंगतं मन्हा आंगवर उनीन्हा!म्हनंस कशी,’तुम्ही सांगू नका माले!तुम्ही त्या इनोदभाऊतीन ज्यास्तीं शिखेल मंग आसं काब्र से!’ कसी समजाडू हिले?
मी काय सल्ल्या नयी व्हतु, तठ व्हयी आंगवर जातु!तरीभी समजाडी सांगान्ह्या आवकाया करी ऱ्हायंतू ,’तुन्हा डोकामां घुसी ऱ्हायना का?मी प्रायव्हेट कंपनीम्हा से!कंपनीम्हा जितला पगार भेटस तो बठ्ठास्तिन वर माले से!बाकींनासले कमी से!आठे या गल्लीम्हा आपले जागा भेटनी!बांधकाम करी घर बांध!आंगेपांगे चांगला मानसे सेतंस! भागबल्ली सेतंस,अश्या लोकेस्म्हा ऱ्हातसं आपुन!’ बाई जराखी थंडी पन्नी!पन तिनंडोकाम्हानं हावरंपन तिले कोल्ली खटक करी ऱ्हायंत!
दुसरान्ह दखी बयांन्ह!बयेत ऱ्हावानं!दुसरान्हा आनंनम्हा आनंन मानो नयी!दुसरास्न दखी बयेत बठो! समोरला भागबल्ली व्हयी!त्याले भेटनं!आपले भेटीचं आसं नयी से!आपुन आपले बिनकामनां तरास करी लेवो!समोरला बाटान्हा जुत्ता वापरी ऱ्हायना!आपुन आपली आयपत दखी सिल्परं घालालें काय वावगं से!पन तसं नहीं!आपुन गटांना करत ऱ्हावो!गंजस लोके असा आडाआडा चाव्वयंतसं!घालीपाडी बोलतंस!बठी बठी निस्त कुथतसं!त्यास्ना डोकाम्हा दुसरानं दखी बयान्हा गच्ची किडा पडी जायेल ऱ्हातसं!
काहीजन सांगऱ्या डांग्र्यामांगे लागी आपला घरले लालभुंदूंग तावावर हुभा करी देतंस!सोता बयानं!संगे दुसरांस्लें भी तावावरं हुभं करी ठेवतंस!आशा या येडी मत्थीना लोके आक्सी दुसरान्ह दखी रंगत बायी कोल्ला व्हतस!दुसरान्हा तंगडीम्हा तंगंडी आडकायी पाडान्ह काम करतंसं!यासले निचितवार आशी जप नयी लागतं!सोतालें भेटनं का वरन्ह आभूट दोन हातवर धराल्हे दखतसं!मनोसनी आपलं अंथरून दखी पाय पसरो!कोन करोडपती ऱ्हावो!आपल्या बिबता आपल्याचें सवारी-सुवारी लेन्या पडतीनं!
आनंन जग दुन्याथीन मोठा ऱ्हास!परतेकलें मुख्यमंत्री व्हता येत नयी!परत्येकलें पंतप्रधान व्हता येत नयी!परत्येकलें उद्योगपती व्हता येत नयी!कष्ट आनी जिद्द लागस!फय भेटत ऱ्हास!कस्ट करीस्नी भी फय नयी भेटनं तें तो नसीबन्हा भाग मानी मव्हरे जात ऱ्हावो!सोता खुश!घर खुश!समाज खुश!जग खुश!इनोदनी गाडी लिधी माले आनंन व्हयना!मन्हा शेजारनांनी गाडी लिधी!कोनां वायबारन्हा मांगे लागी आपुन फुकटम्हा दुःख लेवो नयी!’तुंनकडे से मंग मनगंम काब्र नयी!’हायी इसरी सुखूनन्ही जिंदगी जगो!
नानाभाऊ माळी
(मु.पो.ता. शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु.हडपसर,पूणे-४११०२८
दिनांक-०३ ऑगस्ट २०२४