चार दिननी पाव्हनी Khandeshi Ahirani Diwali
मन्हा घर व दिवायी
उनी उनी व पाव्हनी
वसू बारसना दिन
चार दिननी पाव्हनी॥धृ॥
इना मनम्हा उजाया
उजायाम्हा उजयनी
अमावसनी रातले
हायी उजायाम्हा उनी॥१॥
इना साठी अमावस
उजायाम्हा उजयनी
साल भरनं उजायं
एक दिनम्हा लयनी॥२॥
मंग मन्ही भाऊबीज
मनम्हावं उमयनी
वाट माहेरनी मंग
आपसुक खुली उनी॥३॥
जशी भाऊ ना वं घर
येस बहिन पाव्हनी
उनी दिवायी व तशी
चार दिननी पाव्हनी॥४॥
-निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्ट, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
{ दि.४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित व्हयेल मन्हा
अहिरानी ई कविता संग्रह *मन्ही खान्देशी बोलनी* म्हा हायी कविता छापायनी.}
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
शब्दार्थ– मन्हा=माझ्या, दिवायी=दिवाळी, उनी=आली, दिननी=दिवसांची, पाव्हनी=पाहुणी, इना=हिच्या, मनम्हा =मनात, उजायं =उजेड, उजायाम्हा =उजेडात, उजयनी=उजळली, रातले=रात्री, हायी, साल भरनं=वर्ष भराचं, लयनी=घेऊन आली, मंग=मग, उमयनी=उमळून आली-उचंबळून आली, आपसुक =आपोआप, खुली उनी=खुलून आली, येस=येते.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

अहिरानी बोली भाषाम्हा प्रकाशित ई कवितासंग्रह ‘मन्ही खान्देशी बोलनी’ म्हाईन
मोल माले ह्या माटीनं
दिवायीना दिवा तुले
एक सांगस सांगनं
तुले देखी खुलनं रे
मन्हा मननं आंगन॥धृ॥
दिवायीना दिवा तुले
एक मांगस मांगनं
तुन्हा उजायाम्हा मन्हं
घर भरु दे आंगन॥१॥
दिवायीना दिवा तुन्हं
आसं कसं रे हासनं
तुन्हं तुलेच ठाऊक
बयीसनी बी हासनं॥२॥
दिवायीना दिवा तुन्हं
रुप कसं रे माटीनं
तुन्हा गतच से मन्हं
देख जीवन माटीनं॥३॥
माटीनी बी उजायानं
कसं देख रे सपन
माटीनच माटीलेच
मीबी करसू अर्पन॥४॥
–निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
शब्दार्थ :- दिवायीना =दिवाळीच्या, तुले =तुला, सांगस=सांगते, सांगनं=सांगणं, खुलनं=खुललं, मन्हा =माझ्या, मननं=मनाचं, आंगनं=अंगण, मांगस=मागते, मांगनं=मागणं, उजायाम्हा =उजेडात-प्रकाशात,मन्हं= माझं,
तुन्हं=तुझं, आसं=असं, तुलेच=तुलाच, बयीसनी=जळूनही, हासनं=हसणं, माटीनं=मातीचं, गतच=प्रमाणे-सारखे, से= आहे, माटीनीबी=मातीनेही, उजायानं =प्रकाशाचं, देखं=पाहिलं,
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
दिवाईना फटाका वरतेन नातूना दांगडो