गवराई ना सनले
अहिरानी बोली भाषेतील ई कविता संग्रह मन्ही खान्देशी बोलनी म्हाईन
गवराई ना सनले
आखाजीले आखाजीले
कशी येस व कोठेन
हूरहूर बी जीवले॥धृ॥
याद येस काय सांगू
मन्हं ठाऊक वं माले
चार सबद पत्राम्हा
नही टाईम लिवाले ॥१॥
माय भाऊना भेटना
ध्यास लागना जीवले
यीशी कव्हयं कव्हयं
आस तशी माऊलीले॥२॥
जुपी दिन्हा ह्या जीवले
घर वावर मयाले
एक आखाजी सनले
देख भेटस येवाले॥३॥
मन्हं मन मोठ व्हस
सन येता आखाजीले
मोल येस वं सोनानं
काय सांगू कायीजले॥४॥
घरदार नी धनिन
मन्हा सोदसू धनीले
मंग वाट माहेरनी
धरसू व आखाजीले ॥५॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी , प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
शब्दार्थ :- गवराई =गौरी, सनले=सणाला, आखाजीले =अक्षय तृतीयेला, येस=येते, कोठेन=कोठून, जीवले=जिवाला,मन्हं =माझं, माले=मला, सबद=शब्द, पत्राम्हा=पत्रात, लिवाले=लिहायला, लागना=लागला, यीशी=येशील, कव्हयं=केंव्हा, वावर=शेत, मयाले=मळ्याला, जुपी=जुंपून, दिन्हा=दिला,येवाले=यायला, व्हस=होतं, सोनानं=सोन्याचं, कायीजले=काळजाला, सोदसू=विचारेन, धरसू=धरेन.
आखाजीनी अपुर्वाई
आखाजीनी अपुर्वाई
मन्हा खान्देस मझार
आखाजीनी अपुर्वाई
दिन उना आंबासना
आठे रसनी बढाई ॥धृ॥
रस संगे मजानी व
देखा खापरनी पोयी
दाय पानीनी रसोयी
मजा आखो च वाढाई॥१॥
भजी कुल्लाया पापड
आख्खं ताट भरी जायी
संगे निंबूनी बी फोड
देखा सवाद वाढाई॥२॥
मन्ही सुखनी नांदस
सासरम्हा गवराई
सन उना आखाजीना
गौराईले याद येई॥३॥
उनी माहेर भेटले
उनी मन्ही गवराई
येता गवराई माले
आखाजीनी अपुर्वाई॥४॥
बारा महिनानी मीबी
करसू व भरपाई
लाड कोड पुरावसू
लेक लाडना जव्वाई॥५॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३

आज आखाजी से सुनी
अहिरानी बोली भाषेतील ई कविता संग्रह मन्ही खान्देशी बोलनी
स्त्री भ्रूण हत्त्येच्या समस्या काळात सुचलेली ही कविता..
आज आखाजी से सुनी
बारा महिनाम्हा उनी
उनी आखजी व उनी
पन गौराई बिगर
आज आखाजी से सुनी॥धृ॥
घर आंगन गली बी
गौर बिगर से सुनी
आंबावर निंबवर
सर झोकानी बी सुनी॥१॥
काय सांगू लोकेसले
बात एकच से जुनी
खट्टी कयरी बिगर
गोडी आंबाले ना उनी॥२॥
दुनियाच मिटाडानी
आज यासनी करनी
घरेघर एक तरी
गौरी जोयजे उरनी॥३॥
देखिसनी देख जरा
मन्ही रडस धरनी
देख रडस धरनी
माय हरेक घरनी॥४॥
सुख दुखंले एकबी
नही आंडेर र्हायनी
सर नही आंडेरनी
वहू बेटी परायनी॥५॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०३०३.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
शब्दार्थ :- आखाजी=अक्षय तृतीया, महिनाम्हा=महिन्यात, पन=पण, बिगर=शिवाय, सर झोकानी =झाक्याची सर, लोकेसले=लोकांना, खट्टी कयरी=आंबट कैरी, आंबाले=आंब्याला, मिटाडानी =मिटवण्याची, यासनी=यांची, घरेघर=घरोघरी, जोयजे=पाहिजे, देखिसनी=बघून,धरनी=धरणी, आंडेर =कन्या, र्हायनी=राहिली, परायनी=परक्याची.

सन मन्हा आखाजीना
कविता ई कवितासंग्रहातून अहिरानी बोली भाषेतील
सन मन्हा आखाजीना
उना सनम्हा वं सन
सन उना आखाजीना
सन उना आखाजीना
माले भाऊ मूयं उना॥धृ॥
मन्हा भाऊ मन्हा भाऊ
काय सांगू व गुनना
हिरा मोतीना व माले
भाऊ लाभना लाखना॥१॥
उना सन आखाजीना
ऐक शेजी ऐकी ल्हे ना
माले भाऊ मूयं उना
खुशी मनम्हा म्हायेना॥२॥
मन्हा बिगर वं सुना
आंगनना कोना कोना
माय म्हने लेकी बाई
कधी येशिल तू येना॥३॥
तुन्हा बिगर लागी व
सन आखाजीना सुना
घरोघर उन्यात व
लेकी सासर्वाशी सुना॥४॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅटनं.७अ, नारायणनगर, धरणगांवचौफुलीरोड, एरंडोलजि.जयगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.
शब्दार्थ :- सन=सण, उना=आला, आखाजीना =अक्षय तृतीयेचा, माले=मला, मूयं=मूळ, मन्हा =माझा, लाभना=लाभला-मिळाला, लाखना=लाखाचा, शेजी=शेजारीण, ऐकी ल्हे ना=ऐकून घे गं, मनम्ह =मनात, म्हायेना=मावेना, बिगर=शिवाय, लागी वं=लागेल-वाटेल ग,
उन्यात =आल्यात.