खानदेस रतन आदिमाया बहिनाई
‘ यडीमाय ‘ हाई कविताम्हा बहिनाबाईनी आदिमायन गानं गायेल से. माले तं वाटस ती आदिमाया म्हंजे खुद बहिनाबाईज से. बहिनाबाईना वाटाले दुख उनं,आडचनीस्ना डोंगर उभा -हायनात मातर ती बया डगमगनी नही.
इडापिडा संकटले – देन्हा तुने टाया
झाल्या तुझ्या गयामंधी – नरोडाच्या माया
अशी कशी येळी वो माय, अशी कशी येळी ?
बहिनाबायी यक आंगठेबाज खेडूत बायी व्हती. काव्य कविता म्हंजे काय हायी तिले माहित नव्हत. तरी तीन्ही ह्या गाना कसा रचा व्हतीन ? कसा गाया व्हतीन ?
बरम्ह्या इस्नू रुद्र बाळ – खेळूडले वटी
कोम्हयता फुटे पान्हा – गान आल व्होटी
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी ?
लेकरवायी माय आपना लेकरुले पोटशे छातीशे लावस, त्यान्हा समधा आंगवरथाईन हात फिरावस. म्हंजे आम्हायस कोम्हायस तव्हय आपीआप तीले पान्हा फुटस, तीन्हा तोंडवाटे गानं बाहेर पडस. गड्या हो सांगा मंग हायी आदिमाया बहिनाबाई नही तं कोनं से ?
नशीबाचे नऊ गि-हे – काय तुझ्या लेखी ?
गि-हानाले खाईसनी – कशी झाली सुखी ?
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी ?
बहिनाबाईना आंडोर सोपानकाका चौधरीनी तीन्ही कथा सांगेल से, बहिनाबाईना नशीबम्हा सासरे गरीबि उनी, आयीना तरोनपनम्हा घरधनी साथ सोडी देवघर गया. ह्या गि-हा नहीत तं काय सेत ? मातर हायी बायी ह्या गि-हासलेबी उरीपुरी निंघनी – म्हनिसनी बहिनाबायी आदिमायानाज आवतार से तीले मन्हा मनोमन दंडवत.
जयगावं पासीन यक कोसवर आसोदे खेड गावं से . तठला महाजन घरानाम्हा बहिनाबाईना जनम सन १८८० ले व्हयना. तीन्ह जनम नावं बहिनाबायी. तीन्हा बाप उखाजी महाजन म्हंजे तठली मोठी जमीनदार आसामी.
गावामधी दबदबा – बाप महाजन माझा
त्याचा काटेतोल न्याव – जसा गावामधी राजा !
सदा आबादी आबाद – माझ आसोदं माहेर !
आसां ह्या तालीवान घरानाम्हाईन ती जयगावंना खंडेराव चौधरीनी सुन व्हयीसन वतनदार चौधरी वाडाम्हा उनी. तव्हय ती फकत तेरा वरीसनी व्हती. नांदतं घर मोठ खटल, मातर मव्हरे काही दिनम्हा वाटनी झायी. दोन तीन वरीस मोठा दुस्काय पडना. धान्याना पेव/ कोठा सरना. बहिनाबायीवर दुस्कायी कामवर हातोडाघायी खडी फोडाना वखत उना. मातर ती हासत खेयत त्याले सामोरे गयी. ती भलती इनोदी व्हती. ती म्हने , टाया पिटीसनी देव भेटस नही. ज्याच्या हाते घट्टे … त्यालेच देव भेटे !
बहिनाबायीले देव निसर्गम्हा दिसे, ती म्हने …
तुझ्या पायाची चाहूल – लागे पानापाना मधी
देवा तुझ येनं जानं – वारा सांगे कानामधी
माझ्यासाठी पांडुरंग – तुझं गीता भागवत
पावसात समावतं – माटीमधी उगवत.
म्हंजे बहिनाबायी खेतीमातीसी , सेतकरीना जीवनसी यकरुप व्हयी जायेल व्हती. खेती, पाऊस , पानकया, थंडी,ऊन, वारा, पिके याम्हाज तीले देव भेटे.
बहिनाबायीले समध्या सासरवास्या बायीस्ना गतज माहेरन भारी कवतिक. माहेरन्या साध्यासुध्या गोस्टीजवर ती भलती भारी भरे. माहेरनी वाट, खटलान घर, पोरेसना मया, ऊसना मया, रेलवायीनं फाटूक, पिवयी पिवयी चिकनी खारी ( धाबावर टाकानी माटी ) बाभयी बन, पानीन्या डाबा, गायीम्हसीस्न खिल्लार, लौकी नदी ह्या समध्यसन्या आठवनी तीन्ही जपेल व्हत्यात. ह्या आठवनीसमुये तीन्ह बायपनं तीन्हा डोयामव्हरे नाचे.
माझ्या माहेरच्या वाटे – कोन्ही भिकारी टकारी
आला भीक मांगीसनी – झोयी गेली सम्दी भरी
म्हंजे तीन्हा माहेरना मानसे भलता मोठा मनना सेतस, दानी सेतस दारसे येयेल भिकारीले पोटभर वाढतस, समाधानी करतस.
नीट जाय मायबाई – नको करु धडपड
तुझ्याच मी माहेराच्या – वाटवरला दगड।
तीले माहेरना वाटवरं ठेचबीच लागनी तं दगडले वाचा फुटस नी तो दगड तीले पिरेमम्हा, आपुलकीम्हा सांगे , तु धडपडू नको. मी तुन्हाज माहेरना दगड से. सासरे नांदनार बायीसले माहेरनं कुतर मांजरं भी भेटनं तरी गोड वाटस आपरुक वाटस.
बहिनाबायीनी ‘ कशाला काय म्हनू नये ‘ हायी गोट भारी नामी सांगेल से. त्याम्हानी खोच मातर समजाले पाह्यजे. वानगीदाखल दखा
ज्याच्यामधी नाही भाव – त्याले भक्ती म्हणू नही
ज्याच्यामधी नाही चेव – त्याले शक्ती म्हणू नही
म्हंजे भाव वाचून भक्ती नही आनि चेव वाचून शक्ती नही. आनि हायी गोट सांगनार बहिनाबायीले जगदून्याम्हा तोड नही.
अरे संसार संसार । जसा तावा चुल्यावर
आधी हाताले चटके । तव्हा मियते भाकर
सवसारम्हा यीसन करतबगारी दखाडी, कामधाम कयं तं भाकरतुकडा गियाले भेटस, सवसारना गाडा चालस, सुखनी जप लागस. हायी ग्यान आमरुत ती मायमावली आपुनले पाजस.
अरे संसार संसार । खीरा येलाव-हे तोड
एका तोंडामधी कडू। बाकी सर्वा लागे गोड
सवसार हाऊ खिराकाकडी सारखा से तोंडजोडे कडू मातर बाकी समधा गोड रहास. हायी वोवीम्हा बहिनाबायी आपुनले सवसारन ‘सार’ सांगी जास.
बहिनाबायी तिसीम्हा व्हती तव्हय तीन्हा पोरे पोरका झायात. बहिनाबायी डोंगरयवढ दुक गीसन कामले लागनी ‘ आता माझा माझे जीव’ हायी कविताम्हा बहिनाबायी धरती मायले ,कयवयीसन इचारस :-
सांग सांग धरतीमाता, अशी कशी जादू झाली
झाड गेल निघीसनी, माघे सावली उरली
म्हंजे बायको हायी नवरानी सावली रहास. झाड म्हंजे नवरा निंघी गया मंग मी मांघे कशी राह्यनू ? मंग पुढे बहिनाबायी म्हनस,
जरी फुटल्या बांगड्या, मनगटी करतूत
. तुटे मंगयसूतर, उरे गयाची शपथ
मन्हा कपायन कुकू पुसायना, मनगटवरल्या बांगड्या फुटन्यात मातर मनगटम्हान करतूत करतबगारी कोन्हीभी हिसकावू सकाव नही. मंगयसूतर तुटन मातर देवनी आनं ( सपथ ) गयाम्हा कायमनी आटकेल से. ती तुटाव नही मुडाव नही.
नका नका आयाबाया, नका करू माझी कीव
झाल झाल समाधान, आता माझा माले जीव
म्हंजे मन्ही कीव कोन्ही करु नका..आते मी से नी मन्ही करतूत से.
जगम्हा सवसारम्हा रामायनं महाभारत घडावस ते “मन” कस से यान्ह उभेउभ वरननं तीन्ही करेल से. मनन हायी गुपित संत महाराजेस्ले भी उलगडता उन नही. ‘मन’ इच्चू सापथाईन जहरी इखारी से. इच्चू सापवर उतार रहास मातर मनना जहरवर कोनतज इलाज नही से. ते यवढाम्हा भूईवर दिखस मातर पापनी लवत नही तवढाम्हा आभायम्हाबी जायी लागस. म्हंजे इजना मायक चपय से. मन कव्हय खसखसना दाना यवढ धाकुलस तं कव्हय आभायम्हाबी मावाव नही यवढ भल मोठ दखास
देवा असं कसं मन ? असं कसं रे घडल
कुठे जागेपनी तुले, असं सपनं पडल !
करामती देवले जागेपने पडेल सपनं म्हंजे हायी अजब मन से. हायी अजब मन घडावनार देवनी हायी तं मोठी नवलाई से भो.
बहिनाबाईना गाना म्हंजे कामे करता करता गायेल वोव्या सेतीस. मातर ती मायनी भलत्या अजब रचेल सेत. भारी त-हाम्हा मांडेल सेत. बहिनबायीनी भास्या साधी नी लडीवाय से. त्यामुये इंदिरा संत म्हनस, ” फुलातून सुगंध यावा त्याप्रमाणे ही गाणी मनात दरवळत राहतात. ” बहिनाबायीना गाना म्हंजे खानदेसनी खानम्हा सापडेल “ज्यान्ह मोल व्हवाव नही” आसा रतनेसना खजिनाज से. तसाज तो गहन ग्यानना संमीदंर से. माझ्या जीवा ह्या गानाम्हा ती सांगस ,
आला सास गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं मरनं
एक सासाच अंतर
कोन्ही आयब गयबनं मरन , आपघाती मरनं म्हंजे आपुन म्हनतस, ” माले तं तो चालूज भेटना व्हता, चालूज दिखना व्हता ” बहिनाबायी सांगस तेज खरं से जगनं नी मरनं याम्हा फकत यक सासन आंतर से. मी कोनं हायी कविता म्हा ती सांगस, मानूसनी आभीमानी काहीज कामनी नही से. भूकतीस लागनी म्हंजे तो ल्हा ल्हा करस , तुडमुडस मंग भूकतीस त्याले इचारस, तू कोन ? यवढज कसाले सगयी दुनियाना राजाले मीपनामुये काय मियस ?
सर्व्या दुनियेचा राजा, म्हणे मी कोण ? मी कोण ?
अशा त्याच्या मीपनाले मसनात सिव्हासन
अरे मी कोण ? मी कोण? मीपणाची मरीमाय
देखा हिची त-हा , सोता सोतालेच खाय.
मीपनानी मरीमाय सोता सोताले खायी टाकस.मानूस जोगे पयसा टक्का उना, सत्ता बित्ता भेटनी म्हंजे तो दाटायी जास. त्याले मीपना येस, मीपनामुये तो बह्यकी जास. वाट चुकावस मानुसकी सोडस, मानसे तोडस नी यकदिन त्यान्हाभी नास व्हस. म्हनिसन आभीमानी सोडा नी मानुसकी धरा, आसं तीले सांगन से.
तीन्ही कविताम्हाईन देयेल सन्देस दखा ,
” अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तीनं, झोका झाडाले टांगला
पिलं निजले खोपात, जसा झुलता बंगला
खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी, जरा देख मानसा
तीची उलूशीच चोच, तेच दात तेच ओठ
तुले देले रे देवाने, दोन हात दहा बोट “
सुगरीनना जीव यवढासा राही भी ती आपला पिलुजसाठे कितल सुंदर नामी घर बनाडस. मानुस हाऊ सुगरनं थाईन कितला तरी जादा ताकदवान से. त्यामये मानुसले ती सांगस, ” तू तं बरज काही जादा चांगल करी दखाडू सकस.”
बहिनाबायीना यक यक सबद मनना ठाव ल्हेस.
कायिजले जायी भिडस म्हनिसन आचार्य अत्रे म्हनतस , ” एका निरक्षर आणि अशिक्षित स्री ने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला लावतो असा चमत्कार आहे.” बहिनाबायी आपला हाऊ खजिना आनि दोन आंडोर ओंकार चौधरी, सोपान चौधरी तसज यक आंडेर काशी यासले सोडी ३डिसेंबर १९५१ म्हा हायी जग सोडी गयात.
बहिनाबाईना निमीतखाल जयगावं धुये नंदुरबार नासिक जिल्हानी आहिरानी भास्या उजायाम्हा उनी. आहिरानी भास्यानं गोड रुप , तीन्हा सब्दसाठा, तीन्ही ताकद जगले कयनी. बहिनाबायीनी कविता आहिरानी भास्याले वरदान ठरनी. आहिरानी भासिक खडबडीसन जागा व्हयनात. त्या मायभास्याना मौखिक ठेवा जगमव्हरे आनाले लागनात. तसज नवा नवा लेखक कवी कथा कविता लिखी लिखित आहिरानी साहित्यम्हा भर घालाले लागनात. बहिनामायना हाऊ मोठा उपकारच से आपलावर.
बहिनाबायीले इनम्र आभिवादन.
रमेश बोरसे
संपादक
” खानदेसनी वानगी “