खरा शिलेदार रामोजी पांगोरा khadeshi Ahirani
शिवबाना खरा शिलेदार
युध्द मैदानवर रनधुरंधर .
नाशिक कळवण कण्हेरगडना
जनक असी व्हयेख कणकर…!!
एक भक्कम मानूस
न्यारीच सैन्यमा मजार छाप….
वाघना मायेक लेस छडप
शत्रूले लागे ना थोडीसी भाप…!!
येता औरग्यांन सैन्य कण्हेरी गडले
तळ ठोकिसन बसना रामजी पांगोर…
बारा हत्तीन बय देखाडत मराठा मावळा
मोगलसना कया नायनाट पायथ्यावर….!!
काया दगडानागत देह
भरदार छाती मर्दबाना…
चुकिसन नडनात रामजीना संगे
मोगल्यासले केया कानाबाणा…!!
रामजी पांगेरा लढना मैदानी
शत्रूपन हातबर झाये…
दिलेखान ना काटा काडत
औरंग्यांन चिर हरन कये…!!
येता समोरथीन गनीम देखत
जयकार हरहर महादेव ना झाता…
कडक छातीना शिवबाना भुते
तांडव करत गनीमाना अंत कया…!!
काय तोंड करत दिलेखान देखे
असा कडवा हल्ला कधयच नही देखात…
लेत माघार दिलेखानानी रामजी समोर
राजे शिवबाना भुतां मव्हरे गनीमधी हात टेकात…!!
✍️Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =०७-११-२०२३
