खरं सांगा कोन्हासाठे कोन झटी ऱ्हायनं

खरं सांगा कोन्हासाठे कोन झटी ऱ्हायनं

खरं सांगा

खरं सांगा कोन्हासाठे, कोन झटी ऱ्हायनं,
झटनं बिटनं दूर, आठे जो तो लुटी ऱ्हायनं.

स्वार्थासाठी जो तो आठे, भोंगा फुकी ऱ्हायनात,
भाऊ भाऊ येरायेरना, डोका फोडी ऱ्हायनात.
पेट्रोल डिझेल दिनपरदिन, रोज चढी ऱ्हायनं,
खरं सांगा कोन्हासाठे, कोन झटी ऱ्हायनं.

बळीराजा खेतम्हा राबस, मालले तेन्हा दाम नही,
कर्ज काढी पोऱ्हं शिकाडात, हातले तेस्ना काम नही.
कष्ट करी घाम गायतस, नशिब फुटी ऱ्हायनं,
खरं सांगा कोन्हासाठे, कोन झटी ऱ्हायनं.

जात पात धरम बिरम, सगळं बाजूले ठेवा.
मननी दुस्मनी इसरीसन, एक ताटम्हा जेवा.
इचार करा गड्यास्वन, जीवन घटी ऱ्हायनं,
खरं सांगा कोन्हासाठे, कोन झटी ऱ्हायनं.

© प्रा.बी.एन.चौधरी