काळीधरणि
बैल जूपलैय
मौठालै
पिक पेरालय शेताले
सदरा अंगाले फाटले
घाम अंगाले फूटले
अनवाणी पायाले
मातीने अंग अंग मळकटले
भूख लागली पोटाले
कांदा चटणी भाकर
शेतकरि दादा हातावर घेतले
पाणी पिऊन पोटभर काम करीले
पीक सोणं पेरीले
आनंद लय झाहले
आले नेसून हिरवळ रानाले
हिरवं काकण
हाताले
लाल कूंकू मळवट भरीले
बुजगावणे पीकात लक्ष्मी ऊभी मज दिसले
ङोळयाचं पारंणे फिटले
पंचपक्वान्न बनविले
मज काळी आईस दाखवले
हिरवं सपान
मि
साकार केले
पिक आलय मोठाले
मज आनंद गगनात नं मावले
कवयित्री वंदना नागणे
शिंदे
मंगळवेढा