कपासी
उभी फुटनी कपासी
धव्व्या वावरना रंग
कायी माटीम्हा उतरे
कसा गोरा पांडूरंग
दखी वावरले झूरे
चंद्र आभायम्हा रोज
कसं पंघरे वावर
धव्वी आंगले झावर
चांदी भेट दिन्ही कोनी
मन्हा काया वावरले
दिन सोनाना इथीन
मन्हा घर मावठीले
येचू कपासी वावरे
भरे मन्हं घरदार
भाव करता व्हये ती
यापारीनी हारझार
हाई बोंड कपासीनं
झाके जलमनी लाज
बठ्ठा देवस्थून मोठा
हाऊ देव वाटे आज
ज्ञानेश्वर भामरे
वाघाडी ता शिरपूर जि धुळे
ह.मु.नाशिक

माऊली! कपाशी कईतम्हा शेतकरी दादानी कर्मकहानी भू भारी चितरृल शे !तुमीन