उनी दिव्वायं काढाले
उनी उनी लागनी वं
हायी येवाले येवाले
कोनी तरी आडा व्हा रे
यारे इले आवराले॥धृ॥
दिवायीना बी पहिले
उनी दिवायी कराले
इन्ही दिवायी आम्हनी
व्हयी सन नी कराले॥१॥
हिले लागनी वं घाई
काय म्हनू ह्या घाईले
काय म्हनू ह्या घाईले
महागाई नी घाईले॥२॥
महागाई नी घाईले
इन्ही लगिन घाईले
आग्या येतायानी बेटी
भिडी जास आभायीले॥३॥
तठूनच इन्हं वार
येस मन्ही धरतीले
बयं कोठेन भेटस
आसं इन्हा पखेसले॥४॥
सोना सारखा सनले
उनी दिट का लावाले
मन्हा कान्हदेसले वं
यारे कोन्ही सावराले॥५॥
यारे कोन्ही आवराले
यारे इले पयाडाले
दिवायीना बी पहिले
उनी दिव्वायं काढाले॥६॥
–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
