उतरान संक्रांत

उतरान संक्रांत


हायी पूसम्हाच येस
नवं साल उजयस
नवा सालम्हा सुर्याना
नवा रुपे झयकस॥धृ॥
मन्हा खान्देसम्हा इले
उतरान म्हनतस
जुना सालम्हानं हायी
जुनंपनं व पुससं॥१॥
नवा सालनं स्वागत
देखा हायीच करसं
समदासना पहिले
आखो हायीच मिरस॥२॥
गोडी इना संगे येस
सालभर ती पुरस
काय सांगू गोडी इनी
पुरीसनी बी उरस॥३॥
माय बहिन बिगर
नही आठे बोलतसं
नित मन्हा खान्देसम्हा
उतरान उतरस॥४॥


निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
हायी=ही, पूसम्हाच =पौषमधेच, उजयस=उजळते, पुसस=पुसते, झयकस =झळकते, आखो=पुन्हा, मिरस=मिरते, येस=येते, हिनी=हिची, पुरीसनी=पुरुनही, उरस=उरते, बिगर=शिवाय,वाचून, आठे=इथे, बोलतस=बोलत,बोलतात, उतरस=उतरते.